शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

विहूर धरणातील पाणी आटले

By admin | Updated: March 21, 2016 01:43 IST

यंदा पाऊस कमी पडल्याने महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका रायगड जिल्ह्यालाही बसला असून, पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे.

मेघराज जाधव,  मुरूडयंदा पाऊस कमी पडल्याने महाराष्ट्रात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली आहे. याचा फटका रायगड जिल्ह्यालाही बसला असून, पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. विहूर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील विहूर धरणातील पाणी आटल्याने विहूरसह मोरे, मजगाव, खारदोडकुले, खारीकवाडा, नांदगाव मोहल्ला व कोळीवाडा गावात एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. एप्रिल, मे महिन्यात तर तीव्र पाणीटंचाईचा सामना येथील नागरिकांना करावा लागणार आहे. मुरुड तालुक्यात गतवर्षी १३० इंचाहून अधिक पर्जन्यमान होते. यंदा हे प्रमाण जेमतेम ९४ इंचापर्यंत पोहोचले. तालुक्यात ७३ गावे ३७ वाडे पाडे असून, २४ ग्रामपंचायती कार्यरत आहेत. मुरुड शहराची लोकसंख्या १२ हजार ७७०, तर उर्वरित गावांची लोकसंख्या ६१ हजार ७४७ एवढी आहे. नळपाणी योजनेंतर्गत भारत निर्माण योजनेतून ११ मंजूर कामांपैकी ८ कामे पूर्ण तर ३ प्रगतिपथावर आहेत. शिवकालीन दोन्ही बंधाऱ्यांचे काम पूर्ण असून, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील ८ पैकी ५ कामे पूर्ण, तर ३ अपूर्ण आहेत. विहूर ग्रामपंचायत हद्दीत असलेले धरण यंदा पर्जन्यमान कमी असल्याने भरले नाही. केवळ ५० टक्केच पाणीसाठा होऊ शकला. धरणाला नदी वा गाणी (नैसर्गिक पाझर) यासारखे अन्य स्रोत नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात जेवढा जलसाठा होईल त्यावरच विहूर, मोरे, मजगाव, खारदोडकुले, खारीकपाडा, नांदगाव मोहल्ला, कोळीवाडा व नबाबाच्या पॅलेसला पाणीपुरवठा केला जातो. धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने येत्या एप्रिल, मे महिन्यात टँकर वा विंधण विहिरींशिवाय पर्याय नाही. येथील ग्रामस्थ तला कचकोन तसेच एजाज पांगारकर यांच्या मते, विहूर धरणाच्या क्षमतेपेक्षा अधिक गावांना पाणीपुरवठा करण्याचे शासनाचे आदेश अव्यवहार्य आहेत. त्याचा पुनर्विचार होण्याची आवश्यकता आहे. तसेच मजगाव ग्रामपंचायतीच्या जलवाहिन्यांची देखभाल नीट होत नसल्याने पाणी वाया जाते, अशीही माहिती मिळाली. विहूर धरणाचा पाणीसाठा जेमतेम १५ ते २० दिवस पुरेल. पाण्यावर नियंत्रण आणले तर ग्रामस्थांचा रोष पत्करावा लागतो. येत्या एप्रिल, मे महिन्यात प्रशासनाने टँकर, विंधण विहीर उपलब्ध करून घ्याव्यात. यापेक्षा अंबोली धरणातून ५ इंचाची जलवाहिनी जोडून द्यावी.- इकरार मोदी, सरपंच, विहूरयंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. विहूर धरणात मोठ्या प्रमाणावर गाळ साठला आहे. जनतेने गाळ उपसून न्यावा, जेणेकरून धरणाची खोली वाढेल. मात्र त्यांच्याकडून रॉयल्टी न घेण्याचे आवाहन तहसीलदार उमेश पाटील यांनी केले.- पंडित पाटील, आमदार