शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा सभापतींना घेराव, सत्ताधारी विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 03:17 IST

पनवेल शहराला भीषण पाणीसमस्येने ग्रासले असताना, सत्ताधाऱ्यांमार्फत कोणत्याच उपाययोजना राबविल्या जात नसल्याने विरोधकांनी १३ एप्रिल रोजी महापौरांना घेराव घालून त्यांना यासंदर्भात जाब विचारण्याचा बेत आखला होता.

पनवेल : पनवेल शहराला भीषण पाणीसमस्येने ग्रासले असताना, सत्ताधाऱ्यांमार्फत कोणत्याच उपाययोजना राबविल्या जात नसल्याने विरोधकांनी १३ एप्रिल रोजी महापौरांना घेराव घालून त्यांना यासंदर्भात जाब विचारण्याचा बेत आखला होता. मात्र, महापौर अनुपस्थित असल्याने विरोधकांनी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा सभापती नीलेश बाविस्कर यांच्या दालनात घुसून त्यांना घेराव घातला.या वेळी शेकापचे नगरसेवक गुरुनाथ गायकर, प्रमोद भगत, ज्ञानेश्वर पाटील, अजीज पटेल, सुरेखा मोहोकर, सारिका भगत, गणेश कडू, रवि भगत आदीसह शेकाप कार्यकर्त्यांचा समावेश होता, या वेळी पाणीपुरवठा सभापतींच्या दालनात घुसून त्यांना पाणीप्रश्नावर काय उपाययोजना राबवत आहात, यासंदर्भात जाब विचारण्यास सुरु वात केली. या वेळी बाविस्करांना जाब विचारत असताना महिला बाल कल्याण समितीच्या सभापती दर्शना भोईर यांनी या ठिकाणी प्रवेश करीत संबंधित जाब आयुक्तांना विचारण्याची विनंती शेकाप सदस्यांना केली. या वेळी भडकलेल्या शेकाप नगरसेवक व दर्शना भोईर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. मोठ्या प्रमाणात उडालेला हा गोंधळ शांत करण्यासाठी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी मध्यस्ती करीत, पाणीपुरवठा सभापती नीलेश बाविस्कर यांच्या दालनात प्रवेश केला. या वेळीदेखील विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे आणि सभागृहनेते परेश ठाकूर यांच्यात मोठ्या प्रमाणात शाब्दिक चकमक उडाली. संबंधित जाब आम्हालाच न विचारता आयुक्तांनाही विचारा, असा सवाल या वेळी परेश ठाकूर यांनी विरोधकांना केला. पनवेलच्या पेटलेल्या पाणीप्रश्नावर जाब विचारण्याकरिता आलेल्या विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी पाणीपुरवठा सभापती यांच्या दालनात जोरदार घोषणाबाजी केली.विशेष म्हणजे, पाण्याच्या प्रश्नावरून आयुक्तांसमोर बैठक घेऊ, असा आग्रह सत्ताधारी भाजपा पदाधिकाºयांनी धरला. पालिका मुख्यालयात सुरू असलेला गोंधळ पाहता, आयुक्त दालनाबाहेर आले. या वेळी आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे व सभागृहनेते परेश ठाकूर, पाणीपुरवठा सभापती नीलेश बाविस्कर यांनी संबंधित बाब आयुक्तांच्या कानावर घातली. विरोधक पाणीप्रश्नावरून गोंधळ घालत असल्याचे आयुक्तांना सांगितले. आयुक्तांनी प्रशासनाची बाजू मांडत एकत्र बसून यासंदर्भात तोडगा काढू, असे सांगितले.>सत्ताधाºयांना मुख्यमंत्र्यांनी घरचा आहेर दिला असला, तरी त्यांचे आयुक्तपुराण अद्याप संपलेले नाही. पाणीप्रश्नावरून सत्ताधारी अद्याप आयुक्ताकडे बोट दाखवत आहेत. पनवेलमधील नागरिकांच्या साध्या पिण्याची पाण्याची व्यवस्था न करू शकलेल्या सत्ताधाºयांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही.- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेतेपाणीप्रश्नावर आम्ही गंभीर आहोत. याकरिता विविध योजना आम्ही आखत आहोत. मात्र, पाणीप्रश्नावरून सत्ताधाºयांना टार्गेट करणे चुकीचे आहे. प्रशासनालाही याबाबत जाब विचारणे गरजेचे आहे.- नीलेश बाविस्कर,सभापती, पाणीपुरवठा समिती