शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीपुरवठा योजना कागदावरच

By admin | Updated: March 11, 2016 02:39 IST

तालुक्यातील रेवस कोळीवाडा येथील भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत २००८-०९ च्या पाणीपुरवठा योजनेत घोटाळा झाला आहे.

अलिबाग : तालुक्यातील रेवस कोळीवाडा येथील भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत २००८-०९ च्या पाणीपुरवठा योजनेत घोटाळा झाला आहे. त्यातील दोषींवर कारवाई करावी या मागणीसाठी रेवस ग्रामपंचायत सदस्य मच्छिंद्र पाटील यांनी गुरुवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. न्याय न मिळाल्यास आत्मदहनाचाही इशारा पाटील यांनी दिला आहे.याच प्रकरणी पाटील हे दोन वेळा उपोषणाला बसले होते. मात्र रायगड जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी उपअभियंता आर.एस. माळी यांनी पाटील यांची फक्त आश्वासनावरच बोळवण केल्याचे दिसून येते. रेवस पाणीपुरवठा योजनेसाठी २७ लाख १२ हजार २९९ रुपये खर्च करण्यात आले आहेत. ५ एप्रिल २०११ ला रेवसच्या ग्रामीण पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे ती वर्ग करण्यात आल्याचे १८ जुलै २०१३ च्या प्रशासकीय कागदपत्रांवरुन दिसून येते. मात्र असे असतानाही प्रभारी उपअभियंता आर.एस. माळी यांचे ५ जानेवारी २०१६ ला अहवाल मागविण्याचे प्रयोजन काय, असा प्रश्न पाटील यांनी केला आहे. पाणीपुरवठा योजना सुरु होती, तर एप्रिल-मे २०१५ मध्ये ग्रामपंचायत फंडातून रेवस गावासाठी ५० हजार रुपये खर्च का करावा लागला? या योजनेची कूपनलिका कावेडे येथे असल्याने वास्तविक तेथे पंपघर आणि विद्युत जोडणी असणे आवश्यक होते मात्र तेथे पंपघर आणि विद्युत जोडणीच नाही, अशी सर्व परिस्थिती असताना योजना पूर्ण कशी झाली, असे विविध प्रश्न पाटील यांनी उपस्थित केले आहेत. यातील दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे, अन्यथा आत्मदहनाचा इशाराही त्यांनी दिला आहे. उपअभियंता आर. एस. माळी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.