शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

पाणी संघर्ष यात्रेचा तिसरा दिवस

By admin | Updated: February 17, 2016 02:18 IST

पेण ते वर्षा संघर्ष पाणी पायी वारीला वाशी येथे जलसंपदा विभागाच्या व उत्तर कोकण पाटबंधारे मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हेटवणे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता

पेण : पेण ते वर्षा संघर्ष पाणी पायी वारीला वाशी येथे जलसंपदा विभागाच्या व उत्तर कोकण पाटबंधारे मंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह हेटवणे मध्यम प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व कोलाड इरिगेशनच्या कार्यकारी अभियंतावर्गाने आ. धैर्यशील पाटील व पायी वारीत सहभागी झालेल्या शेकापच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. सिंचनाचा अनुशेष अपूर्ण राहिलेल्या कामाबाबत तातडीने उपाययोजनावर भर देणार, असे आश्वासन देण्यासाठी भेट घेतली. मात्र वाशी सेक्टर ७ मधील स्वयंभू शिवमंदिरात झालेल्या या अनौपचारिक भेटीत आ. धैर्यशील पाटील यांनी ठणकावले. पाटील म्हणाले की, आश्वासनांची साखरपेरणी आता बंद करा. मागील मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्वासन पाळले नाही. तुमच्या अधिकार क्षेत्रात जे नाही ते तुम्ही आम्हाला सांगू नका. आता व्हायचे ते थेट मुख्यमंत्र्यांसोबतच होणार. कालव्याला पाणी आमच्या संघर्षातूनच मिळविणार आहोत, असे ठणकावले. हेटवणे धरणाची निर्मितीच मुळात सिंचनावर आधारित पेणच्या ५२ गावांतील शेतकऱ्यांची ६ हजार ६६८ हेक्टर जमीन ओलिताखाली येण्यासाठी आजवर जलसंपदा विभागाने कार्यवाही केली नाही. २०१३ च्या आॅगस्ट महिन्यात कोकण पाटबंधारे मंडळाच्या सर्व अधिकारीवर्गाची बैठक दिवंगत शेकापचे माजी मंत्री व भाई मोहनराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी २०१३ सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्व्हे करून अडथळे दूर करताना जानेवारी २०१४च्या प्रारंभालाच कालव्याची रखडलेली कामे दूर करण्याचे बैठकीत उपस्थित शेतकरीवर्ग व शेकापच्या ज्येष्ठ नेत्यांना लेखी इतिवृत्तात दिले होते, ते आश्वासन पाळले नाही.त्यावेळी बैठकीस असलेले आ. धैर्यशील पाटील, ज्येष्ठ नेते दिनेश पाटील, के. डी. पाटील, महादेव दिवेकर जलसंपदा विभागाच्या साखरपेरणीचा चांगला अनुभव होता. त्यामुळे आ. पाटील यांनी अधिकाऱ्यांना ठणकावले. यावेळी मुख्य अभियंता अन्सारी, अधीक्षक अभियंता अरुण काळोखे, हेटवणे कार्यकारी अभियंता सतीश गाडे आदी होते. (वार्ताहर)