शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
6
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
7
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
8
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
9
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
10
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
11
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
12
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
13
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
14
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
15
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
16
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
17
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
18
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
19
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
20
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
Daily Top 2Weekly Top 5

प्रतीक्षा बांगलादेशींच्या कागदपत्रांची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 00:18 IST

शासकीय कार्यालयांकडे पाठपुरावा : माहिती देण्यात दिरंगाई

मयूर तांबडे

पनवेल : पनवेल परिसरामध्ये सापडलेल्या बांगलादेशींकडे आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना यासह विविध दाखले मिळाले होते. हे सर्व दाखले व परवाने मिळविण्यासाठी संबंधितांनी कोणते पुरावे जोडले होते याचा तपशील पोलिसांनी संबंधित विभागांकडे मागितला आहे. परंतु याविषयी माहिती मिळण्यास विलंब होत असून काही कार्यालयांमध्ये मूळ कागदपत्रे सापडत नसल्याचेही निदर्शनास आले आहे.

मूळ बांगलादेशी नागरिक असलेला इनामुल मुल्ला हा पनवेलमधील चिखले येथे मनोहर पवार नावाने घरजावई बनून राहत होता. २०१९ च्या वर्षअखेरीस पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याच्याकडे रेशन कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, पारपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, लायसन्स, वय आणि अधिवास दाखला यांसह विविध शासकीय दाखले सापडले होते. त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. हे दाखले काढण्यासाठी त्याच्याकडून कोणकोणती कागदपत्रे वापरण्यात आली होती याची माहिती पोलिसांनी शासकीय कार्यालयांकडून मागवली आहे. पनवेल आरटीओ, पनवेल तहसील, ग्रामपंचायत आणि पॅन कार्ड कार्यालयाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली आहे. अद्यापही आधार कार्ड, मतदान ओळखपत्र यांच्याकडून तालुका पोलिसांना माहिती देण्यात आलेली नाही. खांदेश्वर पोलिसांनी अटक केलेल्या बांगलादेशी महिलेला एका नगरसेवकाने मदत केल्याचे समोर येत असून संबंधितांवर अद्याप काहीही कारवाई झालेली नाही.बांगलादेशी नागरिकांच्या गुन्ह्याच्या तपास करताना बनावट कागदपत्र तयार केल्याचे समोर आले आहे. विविध शासकिय दाखले व परवाने मिळविताना संबंधीतांनी कोणती कागदपत्रे सादर केली याचीही माहिती पोलिस घेत असून त्याचाच भाग म्हणून विविध विभागांकडून माहिती मागविली आहे.पोलिसांनी वाहन परवान्यासाठी सादर केलेल्या कागदपत्रांची प्रत मागितली होती. परंतु याविषयीची कागदपत्रे आढळून आलेली नाहीत. पोलिसांना परवान्याची प्रत काढून देण्यात आलेली आहे.- मनोज ओतारी, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पनवेल

टॅग्स :panvelपनवेल