शहरं
Join us  
Trending Stories
1
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
4
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
5
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
6
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
7
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
8
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
9
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
10
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
11
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
12
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
13
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
14
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
15
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
17
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
18
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
19
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
20
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर बॅनर्समुळे कामोठे विद्रूप

By admin | Updated: March 29, 2016 03:09 IST

सिडकोकडून कामोठे नोडचा विकास करण्यात येत असला तरी या ठिकाणी नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांबरोबरच परिसराचे विद्रूपीकरण

- अरुणकुमार मेहत्रे,  कळंबोली सिडकोकडून कामोठे नोडचा विकास करण्यात येत असला तरी या ठिकाणी नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांबरोबरच परिसराचे विद्रूपीकरण झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. रस्ता, नाका, चौक, उड्डाणपुलावर इतकेच नव्हे तर सिग्नलवरही मोठमोठे होर्डिंग्ज, बॅनर्स बेकायदेशीरपणे लावण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यात राजकीय पक्षांच्या बॅनर्सचा भरणा अधिक आहे. पनवेल परिसरात नेहमीच राजकीय चढाओढ सुरू असते. पनवेल महानगरपालिका व्हावी, याकरिता या वसाहतीतून चळवळ, सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली होती. या नोडमधील लोकवस्तीबरोबरच मतदारांची संख्याही वाढत आहे. मतदारांवर प्रभाव पाडण्यासाठी राजकीय पक्ष नेहमीच विविध युक्त्या लढवत असून बॅनरबाजीवर भर दिला जातो. लहान-मोठ्यांच्या वाढदिवसानिमित्त चौकाचौकात, नाक्यानाक्यावर शुभेच्छांचे बॅनर्स लावले जातात. आपल्या नेत्याला खूश करण्याकरिता बॅनर्स लावले जातात. शेकडो फोटो त्यात छापून ते बॅनर चौकात किंवा महत्त्वाच्या ठिकाणी लावतात. सण, उत्सवाच्या काळात तर या वसाहतीत फक्त बॅनर्स लावण्यात येतात. या स्पर्धेत सर्वच राजकीय पक्ष आघाडीवर आहेत. काही नेते आणि पक्षांनी तर आपली जागा जणू काही आरक्षित करून ठेवली आहे. ठरावीक ठिकाणी त्याच पक्षाचा किंवा नेत्याचा फलक लावण्यात येतो. कित्येकदा बॅनर लावण्यावरून तसेच फोटो न टाकण्यावरून वाद होऊन पोलीस ठाण्यापर्यंत तक्रारी गेल्याची प्रकरणे घडली आहेत. बॅनर फाडणे, काढून टाकणे यामुळे कित्येकदा कायदा आणि व्यवस्था धोक्यात येते. असे असले तरी बॅनरबाजी मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. शहरातील महत्त्वाचे ठिकाण असलेले म्हणजे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे विस्टा कॉर्नर चौक बेकायदेशीर फलकाने हरवून गेला आहे. आवास सहकारी गृहनिर्माण संस्थेसमोर खाऊ गल्ली चौकात बॅनर्स, होर्डिंग्ज दिसत आहेत. गोकूळ डेअरीसमोर सिल्व्हर स्टार इमारत आहे. त्यासमोर जो पदपथ आहे तो व्यावसायिकांनी जाहिरात करणाऱ्या फलकाने अडवला आहे.दुभाजकावर अतिक्रमणकामोठे वसाहतीतील काही रस्ते प्रशस्त आहेत. त्यावर दुभाजक बसविण्यात आले आहेत. विशेषकरून महामार्ग ते मानसरोवर रेल्वे स्थानक हा रस्ता मोठा आहे. या दुभाजकावर सिडकोने काही झाडे लावली आहेत. त्याची जोपासना सुध्दा केली जाते. मात्र त्या दुभाजकावर बेकायदेशीर बॅनर्स, फलक लावण्यात येत आहेत. त्याचबरोबर झाडांना खिळे ठोकून त्यावर बॅनर लावण्यात येतात. याबाबत सिडकोकडून कोणतीही कारवाई होत नाही.तेच नेते तेच चेहरे असलेले बॅनर पाहून आम्ही कंटाळलो आहोत. वर्ष-दोन वर्षे एकच बॅनर अनेक ठिकाणी तसेच आहेत. त्यामुळे ना काही दिसत. त्याचबरोबर सगळे विद्रूपीकरण झाले आहे. जनाची नाही तर मनाची लाज राखून राजकीय नेत्यांनीही बॅनरबाजी थांबवावी.- अनिता गावडे, रहिवासी, कामोठेकामोठे वसाहतीत बॅनर सोडून काहीच दिसत नाही. जिकडे तिकडे फक्त फलक, होर्डिंग्ज दिसतात. सण, उत्सव, मिळेल त्या संधीचा राजकीय मंडळी फायदा उठवतात. सर्वसामान्यांना त्याचा नेमका काय फायदा, असा प्रश्न पडतो. याबाबत सिडकोने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.- कैलास नवले, रहिवासीफेरीवाल्यांनी तर रस्ते आणि पदपथ काबीज केले आहेत. त्याचबरोबर दुकानदारांनी आपली दुकानाची जाहिरात करणारे फलक पदपथावर लावले आहेत. त्यामुळे चालण्याकरिता जागा उरलेले नाही. रस्त्यावर चालताना भरधाव वेगाने जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांची भीती वाटते. याबाबत सिडकोने ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे.- सुनीता सरवदे, रहिवासी, कामोठेबेकायदेशीर फलकाविरोधात आम्ही मोहीम राबवत आहोत. काही वसाहतींमधील फलक काढण्यात आले आहेत. त्या झोन अधिकाऱ्यांना सूचना सुध्दा करण्यात आल्या आहेत. लवकरच याविरोधात मोहीम हाती घेणार आहे. राजकीय पक्ष आणि व्यावसायिकांनी बॅनर व होर्डिंग्ज लावून विद्रूपीकरण करू नये. - एस. जे. गोसावी, बांधकाम नियंत्रक, सिडको