शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
4
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
5
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
6
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
7
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
8
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
9
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
10
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
11
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
12
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
13
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
14
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
15
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
16
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
17
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
18
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
19
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
20
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
Daily Top 2Weekly Top 5

शिरसेमध्ये दारूबंदीचा निर्णय

By admin | Updated: February 17, 2016 02:20 IST

तालुक्यातील शिरसे ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाची वस्ती आहे. ठाकूर आणि कातकरी समाजातील लोक कामधंदा करून आल्यावर कमाविलेला पैसा दारू पिऊन उडवतात

कर्जत : तालुक्यातील शिरसे ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात आदिवासी समाजाची वस्ती आहे. ठाकूर आणि कातकरी समाजातील लोक कामधंदा करून आल्यावर कमाविलेला पैसा दारू पिऊन उडवतात. त्यामुळे आदिवासी समाजातील महिलांच्या पुढाकाराने एका वाडीमध्ये किंवा गावामध्ये नाही तर संपूर्ण शिरसे ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. ठराव करूनदेखील जे लोक दारू पिणार त्यांची आणि हातभट्टी लावतील त्यांची नावे जाहीरपणे फलकावर लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारिप बहुजन महासंघाने तेथील आदिवासी कुटुंबाबरोबर दारूबंदीसाठी जनजागृती करण्याचे काम केले होते. शिवसेनेचे कर्जत विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संतोष भोईर यांची निर्विवाद सत्ता अनेक वर्षांपासून शिरसे ग्रामपंचायतीमध्ये आहे. भोईर यांच्या शब्दाला येथे मोठे वजन असून, ग्रामपंचायतीच्या विशेष सभेत सरपंच रतन वाघमारे आणि उपसरपंच प्रवीण देशमुख यांनी ग्रामपंचायत हद्दीमधील सर्व गावे, आदिवासी वाड्यांमध्ये दारूबंदी व्हावी म्हणून ठराव सादर केला. कातकरी आणि ठाकूर या आदिवासी समाजातील लोक येथे वाड्यांमध्ये वस्ती करून राहत आहेत. तेथील महिला ग्रामस्थांनी आपल्या कुटुंबाची कैफियत सभेत मांडली. कुटुंबप्रमुख दिवसभर मेहनत करून ३०० रु पयांच्या आसपास कमाई करतो आणि रात्री घरात पोहोचेपर्यंत त्यातील अर्धे पैसे दारूच्या अड्ड्यावर जाऊन उडवतो. त्यामुळे घरातील महिलांना घर चालविणे भाग पडते. मुलांचे शिक्षण आणि घरखर्च भागविताना त्या आदिवासी कुटुंबामधील महिलेला प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यामुळे शिरसे ग्रामपंचायतीमधील आदिवासी वाड्यांतील सर्व महिलांची भूमिका लक्षात घेऊन संपूर्ण ग्रामपंचायत हद्दीमध्ये दारूबंदी करण्याचा निर्णय घेण्यात आला.सरपंच वाघमारे आणि उपसरपंच देशमुख यांनी मांडलेल्या ठरावाला सदस्य मारु ती गुरव, सुमन भोईर, सीता वाघमारे, लता देशमुख, मीना काकडे, पांडुरंग चौधरी, विमल नाईक यांनी जाहीर पाठिंबा दिला. त्यामुळे दारूबंदीचा ठराव एकमताने मंजूर झाला. याप्रसंगी महिला पोलीस पाटील नयना भोईर तसेच वसंत वाघमारे यांच्यासह ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संतोष पवार आदी उपस्थित होते. (वार्ताहर)