शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

सक्तीच्या देणगीवरुन वाशीत गौरी गणरायाचे विसर्जन थांबले

By admin | Updated: September 11, 2016 02:41 IST

श्री गणेशाच्या विसर्जनाच्या वेळी सक्तीने देणगी मागीतली जात असल्याचा प्रकार पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाहणी दौऱ्या दरम्यान वाशी तलावावर उघडकीस आला.

नवी मुंबई : श्री गणेशाच्या विसर्जनाच्या वेळी सक्तीने देणगी मागीतली जात असल्याचा प्रकार पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पाहणी दौऱ्या दरम्यान वाशी तलावावर उघडकीस आला. यावेळी सक्तीने देणगी घेणाऱ्यांवर आयुक्तांनी कारवाईचे निर्देश देताच स्वयंसेवकांनी गणेशमुर्तींचे विसर्जन थांबवले. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीनंतर विसर्जनाच्या प्रक्रियेला पुन्हा सुरूवात झाली. वाशी येथील तलावात विसर्जन करण्यासाठी स्वयंसेवक गणेशभक्तांकडून सक्तीने देणगी घेत असल्याचे आयुक्तांच्या निदर्शनास आले. हि देणगी स्विकारण्यासाठी विसर्जन तलावावर दानपेटी देखिल ठेवण्यात आली होती. स्वयंसेवकांना महापालिका मानधन देत असतानाही देणगी उकळली जात होती. शिवाय काही गणेशभक्तांनी देखिल आयुक्तांकडे स्वयंसेवकांच्या मनामानी कारभाराची थेट तक्रार केली. त्यामुळे देणगी घेणाऱ्या स्वयंसेवकांवर कारवाई करण्याच्या सुचना आयुक्तांनी पोलिसांना केल्या. त्यानुसार उपस्थित पोलिसांनी काही स्वयंसेवकांना ताब्यात घेताच सर्वच स्वयंसेवकांनी विसर्जन थांबवले. सुमारे १० ते १५ मिनिंटे चाललेल्या या प्रकारामुळे विसर्जन केंद्रावर तणाव निर्माण झाला होता. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ उपआयुक्त प्रशांत खैरे, वरिष्ठ निरिक्षक अजयकुमार लांडगे यांनी घटनास्थळी धाव घेतली. विसर्जनाची प्रक्रीया सुरु करण्याच्या पोलिसांनी सुचना करुनही स्वयंसेवक तलावाबाहेर येवून थांबले. पालिकेसाठी आपण काम करणार नसल्याचे त्यांनी सांगितले. अखेर त्याठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पोलीस मित्र म्हणुन काम करण्याचे पोलिसांचे आवाहन स्विकारत स्वयंसेवकांनी विसर्जनाला सुरवात केली.आयुक्तांना निदर्शनास आलेला हाच प्रकार शहरातील सर्वच विसर्जन स्थळांवरुन होत असतो. स्वयंसेवकांकडून मुर्ती विसर्जनासाठी सक्तीने देणगी मागीतली जात असल्यामुळे अनेकदा गणेशभक्तांसोबत त्यांचे वाद होत असतात. त्यामुळे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी घेतलेल्या भूमिकेचे शहरातील गणेशभक्तांनी स्वागत केले आहे. (प्रतिनिधी)