शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या वाशी कार्यालयात तोडफोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2020 00:41 IST

वीजबिलाची हंडीही फोडली; मनसेच्या चार कार्यकर्त्यांना केली अटक

नवी मुंबई : वीजबिलवाढीचा प्रश्न सुटत नसल्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या वाशी कार्यालयात तोडफोड केली. वीजबिलांची हंडी फोडून प्रशासनाचा निषेध केला. या प्रकरणी चार कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.नवी मुंबईमध्ये लॉकडाऊनच्या काळात अंदाजे वीजबिले दिली आहेत. बिलांमधील चुकांची दुरुस्ती करावी. अन्यायकारक बिलवाढ रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली होती. नवी मुंबईमध्ये पक्षाच्या वतीने बिलांची होळीही करण्यात आली होती. यानंतरही काहीच उपाययोजना न केल्यामुळे संतापलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी वाशी सेक्टर १७ मधील अधीक्षक अभियंता कार्यालयात तोडफोड केली. कार्यालयात बैठक व्यवस्थेसाठी लावलेल्या काचेची आवरणे तोडून टाकली. वीजबिलवाढीची हंडी करून तीही कार्यालयात फोडून शासन व प्रशासनाचा निषेध केला.या प्रकरणी पोलिसांनी पक्षाचे पदाधिकारी संदीप गलगुडे, अमोल इंगळे, आकाश पोतेकर, शरद दिघे या चौघांविरोधात वाशी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. चारही पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. शहरवासीयांच्या हितासाठी हे आंदोलन केले असून, वीजबिलांचा प्रश्न सुटला नाही, तर अजून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाºयांनी दिला आहे.नवी मुंबईसह राज्यात सर्वत्र वीजबिलांचा गोंधळ सुरू आहे. चुकीची व वाढीव रकमेची बिले नागरिकांना दिली आहेत. यापूर्वी बिलांची होळी करून प्रशासनाला इशारा दिला होता, परंतु त्यानंतरही काहीच कार्यवाही झाली नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली.- गजानन काळे, मनसे शहर अध्यक्ष, नवी मुंबई

टॅग्स :mahavitaranमहावितरण