शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
2
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
3
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
4
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
5
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
6
जखमी चेहरा अन् एक पाय गमावला...; इराणी सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्याबाबत नवा खुलासा
7
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
8
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
9
'शांतीदूत' बनल्याने पाकिस्तानचे पाप धुवून निघणार नाही! शशी थरूर यांची शेजारी राष्ट्रावर सडकून टीका
10
“अजिबात सोपे नाही, पण काही होऊ दे, होर्मुझ जलमार्ग सुरू करणारच”; डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्धार
11
हॉस्पिटलचं बिल कमी होणार? IRDAI नं बनवली एक सब कमिटी, काय असेल याचं काम?
12
'त्याच्याशीच लग्न करेन' म्हणत तरुणी अडून बसली; पोलिसांनी बोलावले तरीही घरच्यांनी दिला नकार अन् घडला थरार
13
मृणाल ठाकूरची इंडस्ट्रीतली सर्वात जवळची मैत्रीण कोण? 'या' अभिनेत्रीचं घेतलं नाव, म्हणाली...
14
Peace Of Mind: मनावर ताबा मिळवण्यासाठी आणि जीवन समृद्ध करण्यासाठी भगवान बुद्धांनी सांगितले ९ सुवर्ण मार्ग
15
PSL 2026: "उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
16
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
17
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
18
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
19
वरुथिनी एकादशी २०२६: १० हजार वर्षांच्या तपश्चर्येचे फळ केवळ एका व्रतात! जाणून घ्या 'वरुथिनी एकादशी'चे पूजा विधी
20
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता निर्मितीसाठी प्लास्टिकचा वापर

By admin | Updated: December 29, 2016 02:47 IST

दैनंदिन गोळा होणाऱ्या घनकचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करणाऱ्या महापालिकेने आता रस्त्यांच्या निर्मितीसाठी प्लास्टिकचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी मुंबई : दैनंदिन गोळा होणाऱ्या घनकचऱ्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया करणाऱ्या महापालिकेने आता रस्त्यांच्या निर्मितीसाठी प्लास्टिकचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे १00 मीटर लांबीच्या दहा रस्त्यांचे कामही सुरू करण्यात आले आहे. टप्प्याटप्प्याने शहरातील सर्व रस्त्यांच्या डांबरीकरणात प्लास्टिकचा वापर करण्याची महापालिकेची योजना आहे. या अभिनव प्रयोगामुळे पर्यावरणाचेही संरक्षण होणार आहे.शहरात निर्माण होणाऱ्या शेकडो टन दैनंदिन घनकचऱ्यावर तुर्भे येथील क्षेपणभूमीवर शास्त्रोक्त पध्दतीने प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पात घनकचऱ्यापासून खते व फ्युएल पॅलेट्स तयार केल्या जातात, तर प्लास्टिक कचऱ्यापासून दाणे(ग्रॅन्युल्स) तयार केले जातात. टाकाऊ प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेले हे दाणे आता डांबरी रस्ते तयार करताना वापरात आणले जाणार आहेत. गेल्या आठवड्यात एमआयडीसीतील रस्त्यांच्या डागडुजीसाठी हा प्रयोग करण्यात आला होता. हा प्रयोग अत्यंत यशस्वी झाल्याने महापालिकेच्या स्थापत्य विभागाने आता शहरातील अन्य रस्त्यांच्या निर्मितीसाठी या प्लास्टिकच्या दाण्यांचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. रस्त्यांच्या डांबरीकरणात हे प्लास्टिकयुक्त दाणे वापरल्याने रस्त्यांची लवचिकता वाढते. त्यामुळे रस्त्यांला भेगा पडत नाहीत. तसेच वरील थरामध्ये या प्लास्टिक दाण्यांचा वापर केल्याने रस्त्यांवर पाणी झिरपत नाही. पर्यायाने रस्त्यांचे आयुष्य वाढते, असा महापालिकेच्या संबंधित विभागाचा दावा आहे. जगात प्लास्टिकची विल्हेवाट लावण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने उचललेले पाऊल उपयुक्त व पर्यावरणपूरक असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)