शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

उरणकरांना प्रतीक्षा नेरूळ-उरण रेल्वेची

By admin | Updated: August 6, 2016 02:27 IST

नेरूळ-उरण २७ कि मी लांबीच्या महत्त्वाकांक्षी दुहेरी रेल्वेमार्गाचे काम अगदी धीम्या गतीने सुरू आहे.

मधुकर ठाकूर,

उरण- मध्य रेल्वे आणि सिडको यांच्या भागीदारीत सुरू असलेल्या नेरूळ-उरण २७ कि मी लांबीच्या महत्त्वाकांक्षी दुहेरी रेल्वेमार्गाचे काम अगदी धीम्या गतीने सुरू आहे. १७६२ कोटी खर्चाचा प्रस्तावित प्रकल्प दोन टप्प्यात सुरू झाला आहे. पहिल्या टप्पा सीवूड ते खारकोपर डिसेंबर २०१७ तर खारकोपर ते उरण या दुसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण होण्याची डेडलाइन २०१९ आहे. मात्र रेल्वेमार्गात खारफुटी आणि वन खात्याच्या जमिनीचा खोडा आहे. मागील सहा वर्षांपासून सुरू असलेल्या कामाचा वेग पाहता मुंबईशी जोडणारा हा प्रकल्प मुदतीत पूर्णत्वास जाईल का, याचीच उत्सुकता सर्वांनाच आहे.आंतरराष्ट्रीय जेएनपीटी बंदर आणि विविध प्रकल्पांमुळे उरण परिसराचा औद्योगिकदृष्ट्या झपाट्याने पसारा वाढत चालला आहे. आयात-निर्यातीच्या या वाढत्या पसाऱ्यामुळे उरण आता जगाच्या नकाशावर आले आहे. नवी मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ, प्रस्तावित शिवडी-न्हावा शेवा सेतू आदी प्रकल्पांमुळे तर व्यापारी दृष्टिकोनातून मुंबईबरोबरच उरण देशभरातील विविध रेल्वेमार्गाशी जोडले जावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत. खरे तर ५० वर्षांपूर्वी पनवेल मार्गावरून थेट उरण नौदलाच्या डेपोतून मालाची वाहतूक थांबल्याने हा रेल्वेमार्ग अनेक वर्षांपासून कोणत्याही वापराविना धूळ खात पडला आहे. मात्र जेएनपीटी बंदराच्या निर्मितीनंतर या रेल्वेमार्गाचा पुन्हा एकदा वापर होण्यास सुरुवात झाली. व्यापार वृद्धी आणि परिसराच्या विकासासाठी रेल्वेचे जाळे उभारण्याचा प्रयत्न जेएनपीटी, सिडको, रेल्वेक डून सातत्याने केला जात आहे. त्यासाठी जेएनपीटीकडूनही विविध रेल्वेमार्ग तयार करण्यासाठी निधीची तरतूद केली जात आहे. पहिल्या टप्प्यातील सीवूड ते खारकोपर या रेल्वेमार्गाचे काम प्रगतिपथावर आहे. सीवूड स्थानकाचे काम पूर्ण झाले आहे. डिसेंबर २०१७ पर्यंत या उपनगरीय मार्गावर रेल्वे धावणार आहे. सागरसंगम, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर स्थानकांचे बांधकाम पूर्णत्वाकडे आहे. पनवेल क्रि क ब्रिजसह छोट्या-मोठ्या पुलांचेही काम झाले आहे. उपनगरीय तरघर स्थानक नवी मुंबई विमानतळाशी जोडले जाणार आहे. स्थानकांसाठी डबल डिसचार्ज सुविधा, कंप्युटर सबवे आदि सुविधा असणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात खारकोपर ते उरण या दरम्यान रेल्वेमार्गाचे काम करण्याचा प्रस्ताव आहे. त्याची सुरुवातही झाली आहे.खारकोपर ते उरण या दरम्यान रेल्वेमार्गाच्या कामाची डेडलाइन जून २०१९ पर्यंतची आहे. पहिला टप्पा सीवूड ते खारकोपर रेल्वेमार्ग २०१७ पर्यंत सुरू करण्यासाठी काम सुरू असले तरी उरणपर्यंतच्या रेल्वेमार्गाची खारफुटी आणि वनखात्याच्या जमिनीचा खोड्यामुळे प्रकल्पास विलंब होण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)