शहरं
Join us  
Trending Stories
1
Corona Virus : वेळीच व्हा सावध! कोरोना हळहळू टेन्शन वाढवतोय; ५ दिवसांत १७०० रुग्णांची नोंद, ७ जणांचा मृत्यू
2
"ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानने गुजरातवर मिसाईल्स आणि ६०० ड्रोन डागले, पण..."
3
टॉप सिक्रेट...! शी जिनपिंग यांची एकुलती एक मुलगी अमेरिकेत वास्तव्याला; ट्रम्प तिचा व्हिसा रद्द करणार? कोण आहे ती...
4
धक्कादायक! ८ वर्षांच्या मुलाची लोकांना भीती; सायकल चोरीचा 'मास्टरमाइंड', पोलीसही हैराण
5
नेत्याच्या नातेवाइकाविरोधात तक्रार; पोलिसांनी पीडितेला बसवून ठेवले, आरोपींना चहा पाजून सोडले
6
लज्जास्पद! केरळीयन लोकांच्या कार्यक्रमात शाहिद आफ्रिदीचे जोरदार स्वागत; Video पाहून नेटकरी संतापले...
7
भारताच्या सीमेजवळ चुकूनही जाऊ नका, चिनी दूतावासाची आपल्या नागरिकांना सक्त सूचना, कारण काय?  
8
भारतानं मित्र सौदी अरेबियासाठी नियमांमध्ये दिली मोठी सूट; येणार मोठा पैसा, चीन पाकिस्तानचा जळफळाट होणार
9
४४ बॉलमध्ये ८४...! रोहित शर्मासोबत 'खेळणारा' तो जितेंद्र भाटवडेकर कोण? रणजी खेळलाय की गल्ली क्रिकेट...
10
डोळा सुजला, काळानिळा पडला, एलन मस्कला नेमकं मारलं कुणी? ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीत दिली माहिती   
11
रशियाच्या S-400 नं युक्रेनचं F-16 पाडलं, पुतिन यांनी जवानांना मोठं बक्षिस दिलं; अमेरिकेचं मात्र टेन्शन वाढलं!
12
Astrology: चाळीशी आली तरी लग्न ठरेना? याला ग्रहांची महादशा कारणीभूत असते का? वाचा!
13
Tarot Card: कासवाच्या गतीने का होईना, रोज थोडी प्रगती करा; जूनच्या पहिल्या आठवड्याचे टॅरो भविष्य!
14
प्रायव्हेट जेटमध्ये प्रवास, आलिशान घर आणि रोल्स रॉईसच्या मालक, कोण आहे ही महिला? पतीची संपत्ती ₹१८,३७० कोटी
15
'ऑपरेशन सिंदूरचे पुरावे हवे असतील तर...' ममता कुलकर्णीने राहुल गांधींवर साधला निशाणा
16
Vaishnavi Hagawane Death Case:वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजीकडे;बालकल्याण समितीचा मोठा निर्णय
17
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
18
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
19
भारतीयाचा अमेरिकेच्या रस्त्यावरच ग्रँड विवाह सोहळा; वॉल स्ट्रीटच बंद केला, कोण आहे ही व्यक्ती? तुम्हीही घेऊ शकता भाड्यानं जागा
20
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली

उर्दू शाळेत एकच शिक्षक !

By admin | Updated: February 16, 2016 02:46 IST

येथील नगरपालिकेच्या उर्दू शाळेमध्ये गेल्या चार वर्षांपासून एकच शिक्षक सुमारे ९३ विद्यार्थ्यांना शिकवीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

अलिबाग : येथील नगरपालिकेच्या उर्दू शाळेमध्ये गेल्या चार वर्षांपासून एकच शिक्षक सुमारे ९३ विद्यार्थ्यांना शिकवीत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. पाच शिक्षकांची पदे मंजूर असतानाही सरकारकडून ती भरली जात नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान तर होतच आहे; शिवाय एकाच शिक्षकावर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. सक्तीच्या शिक्षणाचा या घटनेने पुरता बोजवारा उडाल्याने पालकांमध्ये याबाबत नाराजीचा सूर आहे.अलिबाग येथे मुस्लीम वस्ती मोठ्या संख्येने असल्याने उर्दू भाषेतून शिक्षण घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. नगरपालिकेच्या शाळेमध्ये मराठीबरोबरच उर्दू माध्यमातून अभ्यासक्रम शिकविला जात आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या प्राथमिक शिक्षणाची सोय येथे आहे. पहिली ते पाचवीसाठी दोन शिक्षक, सहावी ते आठवीपर्यंत तीन शिक्षक अशा एकूण पाच शिक्षकांची पदे मंजूर आहेत. मात्र येथे गेल्या चार वर्षांपासून एकच शिक्षक कार्यरत आहे. रिक्त जागांची भरती सरकारने अद्याप केलेली नाही. शिक्षकांची संख्या अपुरी असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पहिले ते आठवीच्या आठ वर्गांमध्ये ४१ मुली आणि ५२ मुले अशी एकूण ९३ विद्यार्थ्यांची संख्या आहे. त्यामुळे एकट्या शिक्षकाला एकाच वेळी ९३ विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी पार पाडावी लागत आहे. शिक्षणाचा दर्जा खालावतानाच शिक्षकावर अतिरिक्त कामाचा ताणही पडत आहे. कायमस्वरूपी शिक्षक मिळावा यासाठी शाळा व्यवस्थापक समितीने वेळोवेळी शिक्षण विभागाकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे. मात्र सरकारी पातळीवरून निवेदनाला केराची टोपली दाखविल्याची धारणा त्यांची झाली आहे. एकाच वेळी आम्हाला काही शंका विचारायची झाल्यास एकच शिक्षक असल्याने त्याची उत्तरे त्वरित मिळत नाहीत, असे वास्तव काही विद्यार्थ्यांनी सांगितले.