शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

उरणमधील प्रकल्पग्रस्तांवर गंडांतर; बीपीसीएलचे खासगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 29, 2020 00:57 IST

केंद्र सरकारविरोधात कामगार संघटना आक्रमक

उरण : बीपीसीएलचे खासगीकरण करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे उरणमधील प्रकल्पग्रस्तांना भविष्यात नोकऱ्या मिळण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. खासगीकरणामुळे प्रकल्पग्रस्तांवर गंडांतर आले असल्याने कवडीमोल भावाने जमीन देणाºया शेतकऱ्यांची एकप्रकारे फसवणूकच झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे.सिडकोमार्फत १९८९ मध्ये उरणमध्ये बीपीसीएल प्रकल्प उभारण्यासाठी भेंडखळ, बोकडवीरा, फुंडे, डोंगरी आदी चार ग्रामपंचायत हद्दीतील २०० एकर जागा संपादित करण्यात आली आहे. बीपीसीएल प्रकल्पात कायमच्या नोकºया मिळतील, या आशेवर आणि राष्ट्रहिताचा विचार करून येथील शेतकºयांनी पिकत्या जमिनी कवडीमोल भावाने दिल्या आहेत.बीपीसीएल प्रकल्पासाठी जमीन देणाºया प्रकल्पग्रस्त शेतकºयांची संख्या जवळपास ३५०-४०० पर्यंत आहे. या ४०० शेतकºयांपैकी फक्त १९० प्रकल्पग्रस्तांनाच बीपीसीएल प्रकल्पात नोकºया मिळाल्या आहेत. त्यापैकी आजच्या तारखेपर्यंत ६० कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत फक्त १२८ प्रकल्पग्रस्त कामगारच सध्या बीपीसीएल प्रकल्पात नोकरीत आहेत. सेवानिवृत्तीनंतर उरणच्या बीपीसीएल प्रकल्पात २०२५-२०२६ मध्ये एकही प्रकल्पग्रस्त कामगार उरणार नसल्याची भीती कामगारांकडून व्यक्त होत आहे.उरणच्या बीपीसीएल प्रकल्पात तीन शिफ्टमध्ये ६०-७२ हजार सिलिंडर रिफील केले जातात. यामध्ये घरगुती आणि इंडस्ट्रियल गॅस सिलिंडरचा समावेश आहे. दररोज ७००-९०० मेट्रिक टन गॅस २०० गॅस टँकरद्वारे देशभरात वितरित केला जातो.जेएनपीटी बंदरात बीपीसीएलची स्वतंत्र जेट्टी आहे. या जेएनपीटी बंदरातून बीपीसीएलसाठी आखातातून एलपीजी गॅस जहाजातून आणला जातो. बंदरातून १५ ते १७ हजार मेट्रिक टन क्षमतेच्या जहाजातून २००८ पासून गॅसची वाहतूक केली जाते. २००८ ते २०२० पर्यंत जेएनपीटी बंदरात १५ ते १७ हजार मेट्रिक टन गॅस क्षमतेची ४३८ जहाजे खाली करण्यात आली आहेत. १२०० मेट्रिक टन गॅस क्षमतेची दररोज एक रेल्वे वॅगन उरणच्या बीपीसीएलमधून वितरणासाठी रवाना होते. ओएनजीसीकडूनही दररोज २४ तासांत एक ते दीड मेट्रिक टन गॅस मिळतो. तसेच उरणमध्ये बीपीसीएल प्रकल्पाच्या जागेतच क्रायोजनिक गॅस प्लांटही सुरू करण्यात आला आहे. मुंबई ते उरण थेट गॅस पाइपलाइनही आहे.बीपीसीएल प्लांटमध्ये याआधीच कामगारांची कमतरता आहे. उर्वरित प्रकल्पग्रस्त अनेक वर्षांपासून नोकरीपासून वंचित राहिले आहेत, अशी खंत बीपीसीएल प्रकल्पग्रस्त कामगार कृती समितीच्या पदाधिकाºयांकडून व्यक्त होत आहे.बीपीसीएल प्लांटमध्ये सिलिंडर लोडिंग, अनलोडिंग, लॉरी हेल्पर, रिपेअर शेड स्टॅकिंग, डिस्टॅकिंग आदी कामे कंत्राटी पद्धतीने करण्यात येतात. सबब प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकºया उपलब्ध होत नाहीत. आता तर बीपीसीएलचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.