शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरण संवर्धनाकरिता अनोखा उपक्रम

By admin | Updated: May 23, 2017 02:07 IST

सीबीडी सेक्टर ८ परिसरातील आर्टिस्ट कॉलनीतील तरुणाने पर्यावरण संवर्धनाकरिता पुढाकार घेत पावसाळ््यात एक तरी झाड नक्कीच लावू या हा उपक्रम राबविला आहे.

प्राची सोनवणेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सीबीडी सेक्टर ८ परिसरातील आर्टिस्ट कॉलनीतील तरुणाने पर्यावरण संवर्धनाकरिता पुढाकार घेत पावसाळ््यात एक तरी झाड नक्कीच लावू या हा उपक्रम राबविला आहे. या उपक्रमातंर्गत बियांचे गोळे तयार केले जाणार असून पावसाळ््यात भ्रमंतीसाठी जाताना हे गोळे विविध भागांमध्ये पेरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामध्ये जांभूळ, करंज, सोनमोहर, बाभुळ, गुलमोहर, सफेद सावरा आदी बियांचा समावेश आहे. सीबीडीतील आर्टिस्ट कॉलनी येथे राहणाऱ्या योगेश चव्हाण या तरुणाने ही संकल्पना सर्वांसमोर आणली असून निसर्गप्रेमींच्या पुढाकाराने २००० बियांचे गोळे तयार केले जात आहेत. नुकतेच ५०० गोळे तयार झाल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळण्याचे मुख्य कारण म्हणजे शहरातील झाडांचे प्रमाण कमी होत आहे. प्राणवायू देणाऱ्या वृक्षसंपत्तीच्या रक्षणाकरिता एखादे ठोस पाऊल उचलण्याचे ठरवत ही संकल्पना पुढे आणल्याचेही चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. पावसाळ््यामध्ये भटकंती करायला जाताना मात्र प्रत्येकाने एक तरी गोळ सोबत न्यावा आणि तो गोळ््या हव्या त्या ठिकाणी टाकावा पुढील काम निसर्ग स्वत:च करेल असे या निसर्गप्रेमींनी सांगितले. गड, किल्ले, ट्रेकिंग असो वा पर्यटन स्थळांना भेट द्यायची असेल अशा ठिकाणी हे गोळे सोबत नेल्यास त्याठिकाणी प्रत्येकी एक झाड लावण्याचा संकल्प पूर्ण होऊ शकतो. याकरिता फारसा खर्चही लागत नसून पर्यावरण संवर्धनासाठी मात्र मोलाचा हातभार लागतो. तयार झालेले हे २०० हजार गोळे कोणी, कुठे आणि किती ठिकाणी टाकलेत यांचे फोटो, ठिकाणाचे नाव, माहिती याची नोेंद देखील या उपक्रमांतर्गत घेतली जाणार असल्याची माहिती निसर्गप्रेमी योगेश चव्हाण यांनी दिली. या तरुणाने आतापर्यंत परिसरामध्ये वन्यजीव संरक्षण, वृक्षसंपत्ती जतन करण्याकरिता अनेक उपक्रम हाती घेतले असून पर्यावरण संवर्धनाकरिता परिसरात जनजागृती करण्याचे काम देखील होती घेतले आहे. शहरातील निसर्गप्रेमींनी पुढाकार घेत अशा प्रकारचा उपक्रम आणखी मोठ्या प्रमाणात राबविण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.