शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
6
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
7
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
8
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
9
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
10
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
11
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
12
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
13
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
14
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
15
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
16
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
17
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
18
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
19
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
20
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल

दसऱ्यानिमित्त जुईनगरवासीयांना अनोखी भेट

By admin | Updated: October 11, 2016 03:39 IST

जुईनगरमध्ये अमृता विद्यालयाने मैदानाभोवती अनधिकृतपणे बांधलेली संरक्षण भिंत महापालिकेने हटविली आहे. शाळेचे मैदान

नवी मुंबई : जुईनगरमध्ये अमृता विद्यालयाने मैदानाभोवती अनधिकृतपणे बांधलेली संरक्षण भिंत महापालिकेने हटविली आहे. शाळेचे मैदान नियमाप्रमाणे परिसरातील नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे. लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्यामुळे दसऱ्याची अनोखी भेट मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सिडकोच्या नियोजनामधील त्रुटींमुळे जुईनगरवासीयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. दाट लोकवस्ती असलेल्या या परिसरामध्ये मैदानासाठी पुरेसे भूखंड उपलब्ध करून देण्यात आले नाहीत. येथील अमृता विद्यालयासाठी खेळण्यासाठी मैदानाचा भूखंड दिला आहे. शाळेच्या वेळेव्यतिरिक्त हा भूखंड परिसरातील मुलांना खेळण्यासाठी उपलब्ध करून देण्याची अट ठेवली आहे. पण शाळा व्यवस्थापनाने मैदानाभोवती संरक्षण भिंत बांधली होती. मैदान नागरिकांसाठी खुले करण्यात यावे अशी मागणी स्थानिक नगरसेवक रंगनाथ औटी यांनी महापालिकेकडे केली होती. दोन वर्ष सातत्याने महापालिकेची सर्वसाधारण सभेमध्ये या विषयावर आवाज उठविला होता. अखेर या प्रश्नाची दखल घेवून महापालिकेने अनधिकृतपणे बांधलेली संरक्षण भिंत पाडली आहे. खेळण्यासाठी हक्काचे मैदान उपलब्ध झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. जुईनगरवासीयांना मैदानाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. नवरात्री उत्सवामध्येच प्रशासनाने मैदानावरील अनधिकृतपणे बांधलेली भिंत हटविली आहे. पूर्वीचे सार्वजनिक मैदान व शाळेसाठीचा भूखंड मिळून चांगले क्रीडांगण उपलब्ध होणार आहे. नागरिकांनी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह औटी यांचेही आभार मानले आहेत. (प्रतिनिधी)