शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
4
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
5
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
6
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
7
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
8
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
9
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
10
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
11
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
12
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
13
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
14
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
15
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
16
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
17
Asha Bhosle Funeral: निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
18
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
19
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
20
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील कंत्राटी कामगार बेमुदत संपावर

By admin | Updated: October 25, 2016 04:20 IST

कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. किमान वेतन धोरणाची अंमलबजावणीही केली जात नाही. ऐन दिवाळीमध्ये वेतनापासून वंचित राहावे लागल्यामुळे

नवी मुंबई : कंत्राटी कामगारांना तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. किमान वेतन धोरणाची अंमलबजावणीही केली जात नाही. ऐन दिवाळीमध्ये वेतनापासून वंचित राहावे लागल्यामुळे संतप्त कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे. यामुळे शहरात कचऱ्याचे ढीग निर्माण झाले असून पाणीपुरवठा यंत्रणाही विस्कळीत झाली आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात कंत्राटी कामगारांनीही रणशिंग फुंकले आहे. साफसफाईच्या ठेक्यांना वाढीव मुदत न देता ते रद्द करण्यात आले आहेत. अनेक कामगारांना तीन महिन्यापासून वेतन मिळालेले नाही. वारंवार मागणी करूनही वेतन देण्याविषयी काहीही कार्यवाही होत नाही. दसऱ्यामध्ये उधारी पैसे घेवून सण साजरा करावा लागला. दिवाळी काही दिवसांवर आल्यानंतरही पगार न मिळाल्यामुळे व एक वर्षापासून असलेल्या प्रलंबित मागण्यांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अचानक कामगारांनी संप पुकारला आहे. साफसफाई, कचरा वाहतूक, उद्यान,मलेरिया, पाणीपुरवठा, रूग्णालय विभागातील कर्मचाऱ्यांनी काम थांबविले आहे. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे दिवसभर शहरातील कचरा उचलण्यात आला नाही. रस्त्यांची व उद्यानांची साफसफाई केली नाही. सकाळी पाणीही सोडले नसल्यामुळे नागरिकांची गैरसोय होवू लागली. नागरिकांच्या विनंतीनंतर कामगारांनी पाणी सोडण्यास होकार दिला. पण लवकरच मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. आयुक्तांवरील अविश्वास ठरावाच्या एक दिवस अगोदर कामगारांनी आंदोलन केल्यामुळे त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. अविश्वास ठरावाला कामगारांनी आंदोलनाच्या माध्यमातून अप्रत्यक्ष पाठिंबा दर्शविला आहे. दिवसभर प्रत्येक सोसायटीमध्ये व रोडवर कचरा पडून असल्यामुळे प्रचंड दुर्गंधी निर्माण झाली होती. महापालिकेमध्ये आणिबाणीची स्थिती असल्यामुळे कामगारांशी चर्चा करण्यासाठी कोणीही जबाबदार नागरिक उपस्थित नाही. अविश्वास ठरावानंतरच या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता वर्तविली जात आहे.