शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

माथाडींच्या जागेवर अनधिकृत धार्मिक स्थळ

By admin | Updated: January 18, 2016 02:23 IST

शहरात अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरू असतानाही माथाडींच्या जागेवर झालेले अतिक्रमण हटण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे

नवी मुंबई : शहरात अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरू असतानाही माथाडींच्या जागेवर झालेले अतिक्रमण हटण्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. दीड वर्षापूर्वी सिडकोने माथाडींना घरांसाठी वितरीत केलेल्या ओट्यांवर अनधिकृत धार्मिक स्थळ बांधण्यात आले आहे. यासंबंधीची तक्रार सिडकोकडे करूनही ते हटवण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप माथाडी कामगारांकडून होत आहे.शासनाने मंजूर केलेल्या घर वाटपातल्या घोटाळ्यानंतर सुमारे १० वर्षांनी माथाडी कामगारांना नुकतेच घरांचे वाटप झाले आहे. तिसऱ्या टप्प्याच्या या वाटपात सुमारे ४७१ घरांचे वितरण सिडकोतर्फे झाले आहे. मात्र निर्णयाअभावी घरांसाठी आखलेले हे ओटे सुमारे ३० वर्षांहून अधिक काळ आहे त्या स्थितीत पडून होते. त्यामुळे बहुतांश ओट्यांवर अतिक्रमण व डेब्रिजचे ढीग साचलेले आहेत. त्यामुळे ओटे मिळूनही त्यावर घर बांधण्यासाठी अद्यापही काहींच्या पदरी निराशाच पडली आहे. वितरीत झालेल्या ओट्यांवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी करूनही सिडकोचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. माथाडी कामगार शैलेश भोसले व भिवा उंबरकर हे दोघे गेली दोन वर्षे सिडकोकडे पाठपुरावा करत आहेत. त्यांना कोपरखैरणे सेक्टर १ येथील ५३ व ५४ क्रमांकाच्या ओट्यांचे वितरण झाले आहे. घरासाठी जागा मिळाल्याने त्यांचा आनंद गगनाला मावेनासा झाला होता. राहण्याची सोय नसल्याने गावी ठेवलेले कुटुंब यानिमित्ताने त्यांच्या नजरेसमोर येणार होते. यासाठी जेवढ्या लवकर घर बांधून पूर्ण होईल, तेवढ्या जलद गतीने ते पूर्ण करायची स्वप्ने ते रंगवू लागले होते. मात्र जागा मिळूनही घराचे स्वप्न पूर्ण होण्यात प्रत्यक्ष देवानेच अडथळा केला आहे. मिळालेल्या ओट्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून त्यांनी सिडकोकडे शुल्क देखील भरले. मात्र प्रत्यक्षात जागेची पाहणी केली असता त्यावर अनधिकृत मंदिर असल्याचे समोर आले. हे अनधिकृत मंदिर हटवण्याची त्यांनी संबंधित संघटनेकडे मागणी करूनही त्यांना दाद मिळालेली नाही. अखेर त्यांनी यासंबंधीची तक्रार कामगार युनियन तसेच सिडकोकडे केली. युनियनने देखील याची दखल घेत सिडकोकडे माथाडींच्या जागेवरील अतिक्रमण हटवण्याची मागणी केलेली आहे. त्यानंतरही अतिक्रमण हटवण्यात सिडको विलंब लावत असल्याचा संताप माथाडी कुटुंबांकडून होत आहे.