शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

वाशी उड्डाणपुलाखाली पोलिसांकडूनच अनधिकृत पार्किंग, फर्निचर बनविण्याचा कारखानाही सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 07:33 IST

Vashi : शासनाने मुंबईसह राज्यातील उड्डाणपुलाखाली वाहनतळ सुरू करण्यास मनाई केली आहे. याविषयी उच्च न्यायालयात याचिका दाखल होती.

- नामदेव मोरे

नवी मुंबई : मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर उड्डाणपुलाखाली वाहने उभी करण्यास मनाई आहे. परंतु वाशीतील उड्डाणपुलाखाली वाहतूक पोलिसांनीच वाहने उभी करण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी बेकायदा फर्निचर बनविण्याचा कारखानाही सुरू केला आहे. त्यामुळे पुलाची सुरक्षा धोक्यात आली आहे.शासनाने मुंबईसह राज्यातील उड्डाणपुलाखाली वाहनतळ सुरू करण्यास मनाई केली आहे. याविषयी उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. न्यायालयानेही पुलाखाली पार्किंगला मनाई केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचे उल्लंघन नवी मुंबईमध्ये केले जात आहे. वाहतूक पोलिसांनी पुलाखाली चौकी सुरू केली आहे. सुरुवातीला एकच चौकी होती. परंतु सद्यस्थितीमध्ये एकूण सहा कंटेनर केबिन पुलाखाली बसविण्यात आल्या आहेत. कारवाई केलेल्या मोटरसायकल पुलाखाली उभ्या केल्या जात आहेत. एखादी मोटरसायकल घातपाती कारवाईसाठी रोडवर उभी केली असेल व ती पोलिसांनी उचलून आणून पुलाखाली उभी केल्यामुळे दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. याशिवाय  दिवसभर येथे जवळपास १०० वाहने उभी असल्याचे दिसत आहे. पुलाखाली काही दिवसांपासून फर्निचर बनविण्याचा कारखाना सुरू केला आहे. येथील कारागिरांना विचारणा केली असता येथील फर्निचरची नवी मुंबई बाहेरही विक्री केली जात आहे. फर्निचर बनविण्यासाठी कोणी परवानगी दिली याविषयी विचारणा केली असता वाहतूक विभागातील एक पोलीस कर्मचाऱ्याचे नाव सांगण्यात आले. बिनधास्तपणे फर्निचर बनविले जात असून त्यावर पालिका व इतर प्रशासनही कार्यवाही करत नाही. येथेच एका ठेकेदाराने साईन बोर्ड, वाहतुकीच्या सूचना देणारे फलक, सिग्नलसाठीचे पोल व इतर वाहतूक सूचनांचे फलक बनविणारा कारखाना सुरू केला आहे. त्यासाठी  वेल्डिंग मशीनचाही वापर केला जात आहे. यामुळेही दुर्घटनेची शक्यता आहे.

वीजवापराचीही चौकशी पुलाखाली चौकी व इतर कंटेनर बॉक्ससाठी वीज वापरली जात आहे. फर्निचरसह साईन बोर्ड बनविण्यासाठी विजेचा वापर केला जात आहे. यासाठी वीजजोडणी पुलावरील फलक वा पथदिव्यातून घेतली जात असल्याची शक्यता आहे. उत्सवात मंडळांना शेजारच्या घरातून वीज घेऊन दिली जात नाही.  मग, पुलाखालील उद्योगांना व चौक्यांना हा नियम का लागू नाही का? असा प्रश्न आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई