शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

बेशिस्त पार्किंगचा शहरवासीयांना ताप

By admin | Updated: June 26, 2017 01:42 IST

शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने महापालिकेने कंबर कसली आहे. शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण करणाऱ्या अनियमित प्रकारांना आळा घालण्यासाठी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहर स्वच्छ व सुंदर करण्याच्या दृष्टीने महापालिकेने कंबर कसली आहे. शहराच्या सौंदर्याला बाधा निर्माण करणाऱ्या अनियमित प्रकारांना आळा घालण्यासाठी महापालिकेने मध्यंतरी सकारात्मक पावले उचलली होती. याअंतर्गत रस्त्यावर दुतर्फा होणाऱ्या बेशिस्त पार्किंगला शिस्त लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी वाहतूक विभागाशीही चर्चा करण्यात आली होती; परंतु ही चर्चा केवळ कागदापुरतीच मर्यादित राहिल्याने बेशिस्त पार्किंगचा शहरवासीयांना ताप जाणवू लागला आहे.महापालिका क्षेत्रात अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कडेला दोन्ही बाजूने वाहने उभी केली जातात. त्यामुळे रहदारीला अडथळा होत नियमित वाहतूककोंडी होत आहे. विशेषत: वसाहतीअंतर्गत्च्या अरुंद रस्त्यांवर ही समस्या गंभीर बनली आहे. यासंदर्भात रहिवाशांच्या सातत्याने तक्रारी येत आहेत. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केल्याने दैनंदिन साफ-सफाईच्या कामात अडथळा येत आहे. त्यामुळे स्वच्छ शहर या संकल्पनेला खीळ बसताना दिसत आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला वाहने उभी केल्याने तातडीच्या प्रसंगी रुग्णवाहिका व अग्निशमन दलाच्या वाहनांना मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार वसाहतीअंतर्गतच्या रहदारीच्या रस्त्यांवर सम-विषम, वनसाइड पार्किंग, वन वे-टू वे वाहतूक, तसेच नो पार्किंग क्षेत्र आदींचे नियोजन करण्यात आले होते. अनेक भागांत त्याची कार्यवाहीसुद्धा सुरू करण्यात आली होती. ठिकठिकाणी नो पार्किंगचे सूचना फलकही लावण्यात आले होते. तसेच वाहनधारक आणि नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे जाहीर आवाहन करण्यात आले होते; परंतु त्यांची बदली होताच सुरू करण्यात आलेली ही योजनाही अडगळीत पडल्याचे दिसून आले आहे. अनेक इमारतींमध्ये पार्किंगसाठी स्टील्टच्या जागा आहेत; परंतु या जागेवर अनधिकृत बांधकाम करून त्याचा वाणिज्य व व्यावसायिक वापर केला जात आहे. स्टील्टच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने इमारतीतील रहिवाशांना आपली वाहने रस्त्यावर उभी करावी लागत आहेत. त्यामुळे इमारतीच्या समोरील रस्त्यांवर नेहमीच वाहतूककोंडी होताना दिसत आहे. याची गंभीर दखल घेत, इमारतीतील स्टील्टच्या जागा पार्किंगसाठी खुल्या करण्याचे आवाहन महापालिकेने सोसायटीधारकांना केले होते; परंतु शहरवासीयांनी त्यालाही केराची टोपली दाखविल्याचे दिसून आले आहे. याचा परिणाम म्हणून सर्रासपणे सोसायटीच्या समोरील रस्त्यावर दुतर्फा वाहने उभी केली जातात.शहराच्या अनेक भागांत मोठ्या प्रमाणात अनधिकृत गॅरेजेस सुरू आहेत. त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. शिवाय, पंक्चरचे पाणी, प्लास्टिक रॅपरचा कचरा तसाच टाकला जात असल्याने परिसरात अस्वच्छता पसरत आहे. ही बाब स्वच्छ व सुंदर शहराच्या संकल्पनेला मारक ठरत असल्याने या बेकायदा गॅरेजेसवर कारवाई करण्याचे संकेत दिले होते. तशी योजनाही आखण्यात आली होती; परंतु या योजनेलाही खीळ बसल्याने ही बेकायदा गॅरेजेस सुसाट झाली आहेत. विशेषत: वाशी विभागात सेक्टर १७ व पामबीच मार्गावर अशाप्रकारे बेकायदा गॅरेजेस सुरू आहेत. त्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे.