शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

खांदा वसाहतीतील ए टाईपची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2016 02:09 IST

खांदा वसाहतीतील सेक्टर-८ मधील ए टाईपच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. भिंतींना तडे जाण्यापासून स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. येथील सदनिकाधारक जीव मुठीत धरून राहत असून

प्रशांत शेडगे ,  पनवेलखांदा वसाहतीतील सेक्टर-८ मधील ए टाईपच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. भिंतींना तडे जाण्यापासून स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरूच आहे. येथील सदनिकाधारक जीव मुठीत धरून राहत असून, याबाबत सिडको प्रशासनाकडून कोणताही ठोस निर्णय घेण्यात येत नाही. त्यामुळे या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांचा जीव धोक्यात आहे. सिडकोने ३५ वर्षांपूर्वी खांदा वसाहतीत सेक्टर-८ मध्ये प्रभुकुंज, गजानन, विशाल, त्रिमूर्ती या चार सोसायट्या असून या ठिकाणी सुमारे ४५० सदनिका आहेत. या मोडकळीस आलेल्या इमारतींची अवस्था शतकपूर्ती केलेल्या इमारतींपेक्षाही बिकट आहे. भिंतींना मोठ्या प्रमाणात तÞडे गेले आहेत. दररोज एका तरी ठिकाणी स्लॅब कोसळण्याचे प्रकार घडतात. वरच्या मजल्यावरील घरांना गळती लागते. मलनि:सारण वाहिन्या जुनाट झाल्या असल्याने त्या अनेक ठिकाणी तुंबलेल्या आहेत. आत आणि बाहेरचे प्लॅस्टर निघून गेले असल्याने या इमारतींची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे. या इमारतींची डागडुजी सोसायटीने करायची अशा नियमावर सिडको बोट ठेवते. मात्र या सोसायट्यांमध्ये अल्प उत्पन्न गटातील लोक राहत असल्याने मोठा खर्च करण्याकरिता सोसायटीकडे सुध्दा पैसे नाही. त्यामुळे वेळेत आणि आवश्यक असलेल्या ठिकाणी डागडुजी करता आलेली नाही. त्यामुळे ए टाईपच्या इमारती अधिकच जीर्ण झालेल्या आहेत. सिडकोच्या जुन्या इमारतींचा पुनर्विकास करण्याकरिता राज्य शासनाने मध्यंतरी हिरवा कंदील दिल्यानंतर हालचाली काही प्रमाणात सुरू झाल्या होत्या. ए टाईपचा पुनर्विकास करण्याकरिता काही बांधकाम व्यावसायिकांनी सकारात्मकता दर्शवली होती. त्यानुसार एक दोन बैठकाही झाल्या होत्या मात्र सिडको प्रशासनाकडून कोणत्याही हालचाली नंतरच्या काळामध्ये झालेल्या नाही. वाढीव एफएसआय देण्याच्या निर्णयावर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. मात्र त्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील सिडको इमारतींचा मुद्दा उपस्थित करण्यात आलेला आहे. पालिका क्षेत्राच्या बाहेर म्हणून पनवेल महसूल विभागात असलेल्या कळंबोली, नवीन पनवेल नोडमधील इमारतींच्या पुनर्विकासात कोणतीही अडचण नसल्याचे कायदे तज्ज्ञांचे मत आहे. परंतु सिडको आणि नगरविकास विभागाकडून वेळकाढू धोरण अवलंबली जात आहे.