शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी चोरणारे त्रिकूट अटकेत

By admin | Updated: October 9, 2016 03:32 IST

दुचाकी चोरीप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यापैकी दोघे जण सराईत गुन्हेगार असून, तिघांकडून चोरीच्या १५ मोटारसायकली जप्त करण्यात

नवी मुंबई : दुचाकी चोरीप्रकरणी कोपरखैरणे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यापैकी दोघे जण सराईत गुन्हेगार असून, तिघांकडून चोरीच्या १५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांनी मौजमजेसाठी दुचाकी चोरून वापर केल्यानंतर अज्ञात ठिकाणी सोडून दिल्याचे तपासात उघड झाले आहे.वाहनचोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्याच्या उद्देशाने नवी मुंबई पोलिसांकडून गुन्हेगारांची झाडाझडती घेण्याचे काम सुरू आहे. याकरिता कोपरखैरणे पोलिसांमार्फत विभागातील सराईत गुन्हेगारांची शोधमोहीम सुरू होती. त्याकरिता वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय तायडे यांचे पथक तयार करण्यात आले होते. त्यांच्याकडून गुन्हेगारांची चाचपणी सुरू असताना दोघा दुचाकी चोरांची माहिती मिळाली. त्याआधारे कोपरखैरणे गावातून दोघांना ताब्यात घेण्यात आले. कुणाल यादव (१९) व अजय निर्मल (२०) अशी त्यांची नावे आहेत. चौकशीत त्यांनी परिसरातून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. यादव हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर वाशी पोलीस ठाण्यातदेखील गुन्हे दाखल आहेत. दोघेही मध्यमवर्गीय कुटुंबातील असून, दोघांच्याही वडिलांचे निधन झालेले आहे, तर दोघांनीही शिक्षणही अर्धवट सोडलेले आहे. मागील दीड महिन्यात त्यांनी परिसरातून अनेक दुचाकी चोरल्याची कबुली दिल्याचे पोलीस उपआयुक्त प्रशांत खैरे यांनी सांगितले. त्यापैकी १० दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. केवळ मित्रांसोबत मौजमजा करण्याच्या उद्देशाने त्यांनी या दुचाकी चोरल्या होत्या. बनावट चावीच्या आधारे चोरलेल्या या दुचाकी वापर केल्यानंतर अथवा पेट्रोल संपल्यानंतर त्यांनी अज्ञात ठिकाणी सोडून दिल्या होत्या. चोरीच्या दुचाकीवरून फिरत असताना, ज्या मार्गावर नाकाबंदी सुरू असेल अशा मार्गाने जाणे ते टाळायचे. यामुळे अद्यापपर्यंत ते पोलिसांच्या हाती लागले नव्हते. त्यांना ९ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. दरम्यान, कळवा पोलिसांच्या अटकेतील संदेश मालाडकर याला कोपरखैरणे पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानेही कोपरखैरणेतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. मात्र या वाहनांच्या चोरीच्या गुन्ह्याची नोंदच नसल्यामुळे पोलीस दुचाकी मालकांचा शोध घेत आहेत. तर मालाडकर या सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या तिघांकडून चोरीच्या १५ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)