शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
3
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
4
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
5
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
6
Latest Marathi News LIVE: कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे नोएडामधील सेक्टर क्र. ५९, ६० आणि ६२ मधील कारखान्यातील काम ठप्प
7
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
8
भावनांचा बांध फुटला! आशा भोसले यांच्या अंत्यदर्शनावेळी नात जनाई भावुक, तब्बूने केलं सांत्वन
9
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
10
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
11
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
12
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
13
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
14
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
15
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
16
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
17
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
18
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
19
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
20
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
Daily Top 2Weekly Top 5

दोन इराणी सोनसाखळी चोरांना अटक

By admin | Updated: October 28, 2016 03:56 IST

गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघा सराईत चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ लाख ८८ हजारांचे दागिने जप्त करण्यात असून अठरा गुन्ह्यांची उकल झाली आहे.

नवी मुंबई : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघा सराईत चोरांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १४ लाख ८८ हजारांचे दागिने जप्त करण्यात असून अठरा गुन्ह्यांची उकल झाली आहे. शहरात घडणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याच्या अनुषंगाने गुन्हे शाखा पोलिसांनी कंबर कसली आहे. उपआयुक्त दिलीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करून सराईत सोनसाखळी चोरांचा शोध घेतला आहे. यादरम्यान मध्यवर्ती कक्ष व कक्ष दोनच्या पथकांनी दोघा इराणी सोनसाखळी चोरांना अटक केली आहे. जाफर इराणी (२१) व कंबरअली इराणी अशी त्यांची नावे आहेत. जाफर हा अल्पवयीन असल्यापासून सोनसाखळी चोरी करत आहे. त्याच्यावर आयुक्तालयातील आठहून अधिक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. वाशीतील एका गुन्ह्यात २०१४ साली त्याला मोक्का देखील लावण्यात आलेला आहे. तो मुंबई, ठाणे पोलिसांना देखील पाहिजे आहे. त्याच्या सध्याच्या ठिकाणाची माहिती मध्यवर्ती कक्षाच्या अधिकाऱ्याला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक जगदीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अजित शिंदे यांच्या पथकाने वेशांतर करून सापळा रचून जाफरला अटक केली. चौकशीत त्याने पाच गुन्ह्यांची कबुली दिली असून ६ लाख ९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने त्याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. राज्यात व राज्याबाहेरही अनेक ठिकाणी सोनसाखळी चोरी करणारा कंबरअली हा कोल्हापूरमध्ये असल्याची माहिती कक्ष दोनच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. यानुसार वरिष्ठ निरीक्षक एन. कोल्हटकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक किरण भोसले, बबन जगताप, सुभाष पुजारी यांच्या पथकाने सापळा रचून त्याला अटक केली. त्याने नवी मुंबई आयुक्तालयात केलेल्या १३ गुन्ह्यांची कबुली दिली आहे. त्यानुसार सदर गुन्ह्यामधील ८ लाख ७९ हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल त्याच्याकडून जप्त करण्यात आला आहे. दोन पथकाच्या कारवायांमध्ये एकूण १४ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (प्रतिनिधी)