शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनंतर आता ब्रिटननं दिला भारताला झटका; तेल कंपनीवर लावले आर्थिक निर्बंध, काय होणार परिणाम?
2
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या राकेश किशोरवर अवमानाची कारवाई सुरू; सुप्रीम कोर्टात नेमके काय घडले?
3
VIDEO: मी तुम्हाला बोलवलं नाहीये...; मुंबई विमानतळावर राडाच झाला, जसप्रीत बुमराह का चिडला?
4
“निवडणूक आयोग हा भाजपाची विस्तारित शाखा, फडणवीसांना वकील कुणी केले?”; संजय राऊतांची टीका
5
ओलानं लाँच केला नवा प्रोडक्ट, शेअर्सला लागलं ५% अपर सर्किट; ₹५५ च्या पार पोहोचला भाव
6
दिवाळी २०२५: स्वप्नात महालक्ष्मीचे दर्शन झाले? ‘या’ गोष्टी दिसणे भरभराट-भाग्योदय; शुभ-लाभ!
7
संरक्षण क्षेत्रात १० वर्षात उलाढाल ४६ हजार कोटी वरून दीड लाख कोटींवर; ३ लाख कोटींपर्यंत नेणार - राजनाथ सिंह
8
१३० नक्षलवादी आत्मसमर्पण करणार; अमित शाह यांच्या उपस्थितीत शस्त्रे जमा करणार
9
पीएम मोदींच्या महत्त्वाकांशी योजनेला ख्वाडा? जन-धन योजनेबाबत चिंताजनक बातमी, तुमचं खातं बंद होणार का?
10
EV चार्जिंगशी निगडीत कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; सोनू सूदशी निगडीत आहे कंपनी, ₹१२५ वर आला भाव
11
ताजमहलमधून सरकार एक दिवसांत किती कमाई करतं? तिकीट आणि इतर माहिती जाणून घ्या...
12
Premanand Maharaj: प्रेमानंद महाराजांचे पाच पांडव: कुणी होता लष्करी अधिकारी, तर कुणी सोडली लाखोंची नोकरी
13
VIDEO: मुंबईचा रँचो! लोकलमध्ये प्रसुती वेदना, तरुणाने डॉक्टर मैत्रिणीला व्हिडिओ कॉल करुन केली प्रसुती
14
मुंबईत महिलेवर हल्ला केला आणि कोकणात जाऊन लपला, ४८ वर्षांनी झाली अटक, असा सापडला आरोपी
15
"पप्पांना मारलंय... "; लेकानेच केला खुनी आईचा पर्दाफाश; भाच्याच्या प्रेमात घेतला नवऱ्याचा जीव
16
Video - "मला माफ करा..."; तिकीट नाकारल्यानंतर ढसाढसा रडला नेता, व्यक्त केलं दु:ख
17
महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंसोबत जे झालं, तसंच नितीश कुमारांसोबत होईल? बिहारमध्ये चर्चांना उधाण, पण...
18
सासरेबुवा घरी घेऊन आले २ सूना; लग्नाच्या तिसऱ्या दिवशीच झाल्या गायब अन्... समोर आलं धक्कादायक सत्य
19
Video : सलीम खान राज ठाकरेंच्या भेटीला, गॅलरीमध्ये रंगल्या गप्पा, भेटीचं कारण काय?
20
दर महिना ७० हजार सॅलरी पण हाती शिल्लकच राहत नाही; टेक प्रोफेशनल युवकानं शेअर केला अनुभव

शहरात दोन वेगवेगळ्या अपघातात दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2019 22:54 IST

दुचाकीला जीपची धडक : डम्परच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी; बेशिस्त वाहनचालकांमुळे अपघातांत वाढ

नवी मुंबई : शहरात दोन ठिकाणी अपघातांच्या घटना घडल्या असून, त्यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. या अपघातानंतर संबंधित दोषी वाहनचालकांनी घटनास्थळावरून पळ काढलेला आहे.

नेरुळ व वाशी पोलीसठाण्यात या दोन्ही अपघातांच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. शिरवणे येथे राहणारे विश्वनाथ म्हसकर (६१) हे दुचाकीवरून जात असताना गुरुवारी जुईनगर सेक्टर २४ येथे त्यांना पिकअप जीपने धडक दिली. यामध्ये ते जखमी होऊन रस्त्यावर कोसळले असता, जीप (एमएच ४६ ई २८४२) यावरील चालकाने त्यांना मदतीसाठी न थांबता तिथून पळ काढला.

अखेर प्रत्यक्षदर्शींनी म्हसकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. त्याचप्रमाणे सायन-पनवेल मार्गावर वाशी येथे विकास शिंदे यांना वेगवान डम्परने धडक दिल्याने ते जखमी झाले आहेत.शिंदे हे कामोठेचे राहणारे असून, सायन-पनवेल मार्गाने दुचाकीवरून चालले होते. या वेळी पाठीमागून आलेल्या डम्पर (एमएच ०२ ईआर ३३३९)ने शिंदे यांच्या दुचाकीला धडक मारून पळ काढला. यामध्ये ते जखमी झाल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या दोन्ही घटनांप्रकरणी संबंधित वाहनांच्या चालकांविरोधात नेरुळ व वाशी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.खारपाड्यात शिवशाहीची उड्डाणपुलाला धडकपनवेल : खारपाडा येथील उड्डाणपुलाला शिवशाही बसने दिलेल्या धडकेत एक प्रवासी जखमी झाला.या प्रकरणी तालुका पोलीसठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुहास जगताप असे चालकाचे नाव आहे. पनवेलहून अलिबागच्या दिशेला शिवशाही बस (एमएच ०६ बी एन ५४१) जात होती. ही बस खारपाडा उड्डाणपुलाजवळ आली असता तिने उड्डाणपुलाच्या कठड्याला धडक दिली. धडकेत माधवराव गणपतराव खेरडे (४८) जखमी झाले. बसमध्ये एकूण ३० प्रवासी होते. तालुका पोलिसांनी चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बसमध्ीाल इतर प्रवासीसुदैवाने बचावले.