शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

बॉल लागल्याच्या रागातून दोन गटां हाणामारी

By admin | Updated: June 1, 2017 05:50 IST

बॉल लागल्याच्या रागातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बॉल लागल्याच्या रागातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत तीन जण जखमी झाले. बुधवारी सकाळी घडलेल्या या घटनेप्रकरणी कुरार पोलिसांनी दोन शाळकरी मुलांसह तिघांना अटक केली आहे. गोरेगाव (पूर्व)च्या दिंडोशी सत्र न्यायालयामागे एक मोकळे मैदान आहे. जिथे स्थानिक मुले ‘थ्रो बॉल’ खेळत होती. याच ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा आहे. तेथे सकाळी ६.४५ ते ७.३०च्या सुमारास शाखा भरते. शाखा संपवून ते कार्यकर्ते घरी निघाले असताना, या मुलांचा बॉल यातील एका स्वयंसेवकाला लागला. त्यानंतर दोघांमध्ये भांडण झाले. तेव्हा काही स्थानिकांनी मध्यस्थी करत भांडण मिटविले. मात्र, पुन्हा त्या मुलांनी त्यांना आक्षेपार्ह बोलण्यास सुरुवात केल्यानंतर हाणामारीला सुरुवात झाली. या प्रकारात संघाचे तीन स्वयंसेवक जखमी झाले. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षावर फोन गेल्यानंतर कुरार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमी कार्यकर्त्यांना स्थानिक रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिघांना अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफरोज रशीद सय्यद (२२) सह, दोन शाळकरी मुलांना अटक केली आहे. ज्यातील एक मुलगा १७, तर दुसरा १५ वर्षांचा असल्याचे कुरार पोलिसांनी सांगितले. अल्पवयीन मुलांना सुधारगृहात पाठविण्यात आले आहे. संघाच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याची बाब सोशल मीडियातून पसरली होती. मात्र, ही अफवा असून किरकोळ वादातून हे भांडण झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लिबन्ना व्हनमाने यांनी सांगितले.