शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांसाठी दोन कोटी

By admin | Updated: March 11, 2016 02:43 IST

परजिल्ह्यातील १२ आमदार रायगड जिल्ह्यातील विकासकामे करीत आहेत. त्यांना मिळालेल्या निधीपैकी सुमारे २ कोटी ३७ लाख ५१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचे त्यांनी प्रस्तावित केले आहे

आविष्कार देसाई,  अलिबागपरजिल्ह्यातील १२ आमदार रायगड जिल्ह्यातील विकासकामे करीत आहेत. त्यांना मिळालेल्या निधीपैकी सुमारे २ कोटी ३७ लाख ५१ हजार रुपयांचा निधी खर्च करण्याचे त्यांनी प्रस्तावित केले आहे. आतापर्यंत ४३ विकासकामांच्या माध्यमातून सुमारे एक कोटी तीन लाख सात हजार रुपयांचा विकास निधी त्यांनी जिल्ह्यात खर्च केला आहे. राज्यात विविध राजकीय पक्ष आहेत. त्यामुळे त्यातील काही पक्षांचे आमदार हे निवडून आलेले आहेत. त्यांचे कार्यकर्ते हे राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये विखुरलेले आहेत. त्या विभागामध्ये पक्ष वाढला पाहिजे, या उद्देशाने आमदार आपापला निधी त्या-त्या विभागात खर्च करण्याची तयारी करतात. तसेच काही वेळेला एखाद्या आमदाराच्या कोट्यातील निधीचे वाटप होऊन तो संपतो. त्यामुळे त्यांच्या पक्षातील काही कार्यकर्त्यांना विकासकामे करण्याची संधी उपलब्ध होत नाही. त्यांना कामे दिली नाही, तर त्यांची नाराजी ओढावून घेण्याची नामुश्कीही आमदारांवर येते.कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्यासाठी यावर उपाययोजना म्हणून परजिल्ह्यातील आमदार त्यांचा विकास निधी दुसऱ्या जिल्ह्यात खर्च करतात. त्यामुळे तेथील कार्यकर्त्यांना कामेही मिळतात आणि त्या विभागाचा विकासही साधला जातो. काही वेळा ठरावीक विभागात आमदारांचा निधी खर्च केला जात नाही. त्यामुळे त्या विशिष्ट पक्षाच्या आमदाराचा निधी त्या विभागात खर्च करुन तेथील विकासाचा अनुशेष भरुन काढण्याचा प्रयत्नही त्या अनुषंगाने केला जातो. राज्यातील कोणत्याही मतदार संघात आपापला आमदार निधी खर्च करण्याची मुभा आमदारांना आहे. आमदार आपापला विकास निधी राज्यातील कोणत्याही मतदार संघात खर्च करु शकतात. त्यासाठी त्या-त्या जिल्हाधिकारी यांचे निधी उपलब्ध असल्याचे व हस्तांतरणासंबंधीचे पत्र द्यावे लागते. रायगड जिल्ह्यात परराज्यातील आमदारांनी विकासकामे सुचविली आहेत, तसे काही प्रमाणात निधीही देण्यात आला आहे. -सुनील जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी >>>>>>>>>>आमदार प्र्रस्तावित प्रस्तावित मंजूर कामेरक्कमरक्कमकामेनिरंजन डावखरे ८७.६४१७ ४ २३.३० अनंत गाडगीळ२०.०० २२२०.००प्रकाश बिनसाळे २१.९० ५३१२.०९सुभाष देसाई२०.००२२२०.००नरेंद्र पाटील २४.९९३ २ १०.००राहुल नार्वेकर१०.००१११०.००महादेव जानकर५.००११ ५.००रामनाथ मोते २०.४८ ५ १ २.५०धनंजय मुंडे १०.००२ ० ००जोगेंद्र कवाडे९.००३ ० ००किरण पावसकर ५१ ०००विजय सावंत३.५०१०००