शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर दोन अपघात

By admin | Updated: September 1, 2016 03:21 IST

महाड तालुक्यातील दासगाव आणि वहूर या दोन गावांच्या ठिकाणी दोन वेगवेगळे ट्रकचे अपघात झाले.

दासगाव/ महाड : महाड तालुक्यातील दासगाव आणि वहूर या दोन गावांच्या ठिकाणी दोन वेगवेगळे ट्रकचे अपघात झाले. या अपघातात वहूरमधील दोन्ही गाड्यांचे चालक जखमी झाले. ट्रकला काढण्याचा प्रक्रियेमध्ये जवळपास एक तास महामार्ग बंद पडला होता.बुधवारी सकाळी दासगावचे हद्दीत साबण भरून मुंबईच्या दिशेला जाणारा ट्रक क्र. एमएच १० झेड १७३७ अचानक पलटी झाला. मात्र यामध्ये कोणीही जखमी झाले नाही. तसेच सकाळी ८.१५ वाजण्याच्या सुमारास वहूर गावाजवळील उगवतीवाडीमध्ये गोव्याकडे जाणारा अ‍ॅसिडचा टँकर क्र. एमएच ४३ वाय ३८६ व महाड ते टोक रेती बंदरामध्ये जाणारा वाळू ट्रक क्र. एमएच ०८ एच १३३४ यांची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये दोन्ही ट्रकचालक विकास चव्हाण (४४, रा. लोणेरे) व रणजीत नाईक (३८,रा. उल्हासनगर ) हे जखमी झाले. त्यांना दासगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. वाहतूक कोंडी : दासगाव हद्दीत अपघात झालेल्या ट्रकला सकाळी अचानक बाहेर रस्त्यावर काढण्याचे काम सुरू केल्याने राष्ट्रीय महामार्ग एक तास बंद पडला. या दरम्यान सकाळी शाळेमध्ये जाणाऱ्या मुलांच्या बस अडकून पडल्याने शाळेत जाण्यास जवळपास मुलांना एक तास उशीर झाला. गाडी मालकांनी बिनधास्तपणे महामार्गाचा विचार न करता गाडी काढण्याचे काम सुरूच ठेवले. एका तासानंतर अनेक नागरिकांचे फोन गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग पोलीस शाखा महाड हे या ठिकाणी पोहोचून वाहतूक सुरळीत केली. पोलादपूर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी (३० आॅगस्ट) रात्री ८.१५ वाजता पोलादपूर तालुक्यातील पार्ले गावच्या हद्दीत टँकर उलटल्याने अपघात झाला.चालक राजेशकुमार सुरेंद्र पांडे (रा.निविया-बिहार) मालवाहू टँकरमध्ये इथिलीन ड्राय फ्लोराईड नामक रसायन घेऊन मुंबईकडून रत्नागिरीकडे जात असताना पार्ले गावानजीक त्यांचा वाहनावरील ताबा सुटला व रस्त्यालगत असलेल्या झाडाला धडकून गाडी उलटली. या अपघातात राजेशकुमार पांडे किरकोळ जखमी झाले. त्यांनीच पोलादपूर पोलीस ठाण्यात अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी गाडीतील रसायन गळती होत असल्याने महामार्गावरील वाहतूक काही वेळाकरिता बंद करण्यात आली होती.