शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

माहिती देणारा एलईडी स्क्रीन बंद

By admin | Updated: February 15, 2016 03:03 IST

सरकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी तसेच सरकारी दाखले काढण्यासाठी अडचणी येऊ नयेत, म्हणून ही माहिती सार्वाजनिक करण्याच्या दृष्टीने प

वैभव गायकर,  पनवेलसरकारी योजनांची माहिती सर्वसामान्यांना मिळावी तसेच सरकारी दाखले काढण्यासाठी अडचणी येऊ नयेत, म्हणून ही माहिती सार्वाजनिक करण्याच्या दृष्टीने पनवेल तहसील कार्यलयाच्या वतीने कार्यालयाबाहेर एलईडी स्क्र ोलिंग डिस्प्ले बसविण्यात आला. मात्र काही दिवसांच्या कालावधीनंतरच हा स्क्रीन बंद पडल्याने हा केवळ फार्स असल्याचे बोलले जात आहे. समाजातील विविध मागास प्रवर्गातील जनता आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी योजना अमलात आणल्या जातात. अनेक कल्याणकारी योजनांच्या घोषणा सरकारकडून होतात. मात्र लाभार्थ्यांना याबाबत कोणतीच माहिती उपलब्ध होत नाही. दलाल याचा गैरफायदा घेऊन पैसे उकळण्याचे काम करीत असतात. विविध योजनांचा लाभ कसा घ्यावा, याची माहिती नागरिकांना मिळत नाही. दाखले सरकारी कार्यालयांमधून कसे मिळवायचे, मतदार नोंदणी कशी करायची, स्पर्धा परीक्षा तसेच महसूल विभागात चालणारे कामकाज याची माहिती सर्वसामान्यांना नसते. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणी येत असतात. अनेकदा सरकारी कार्यालयांमध्ये फेऱ्या माराव्या लागतात. यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत एक अभिनव संकल्पना समोर आणली होती. ही संकल्पना जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांत राबवली गेली. प्रत्येक तहसील कार्यालयाच्या दर्शनी भागावर मोठ्या आकाराचा एलईडी टीव्ही लावण्यात आला. या टीव्हीमध्ये सुवर्ण जयंती अभियान अंतर्गत महिन्याच्या प्रत्येक मंगळवारी होणारे चावडी वाचन, फेरफार अदालत तसेच ई-अभिलेख, समाजकल्याण विभागाच्या संजय गांधी योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, श्रावण बाळ योजना अशा विविध योजनांसाठी कोण पात्र आहे अथवा त्याच्या पात्रतेसंदर्भात माहिती, त्यांचा लाभ कसा घेत येईल तसेच पुरवठा विभागाच्या योजना या डिस्प्लेद्वारे नागरिकांना वाचायला मिळत होत्या. सरकारने जाहीर केलेल्या योजनांची माहिती लाभार्थ्यांना नसते. दलाल याचाच गैरफायदा घेत असतात. योजनाबद्दल माहिती देऊन आमच्यामार्फत हे काम करून घेतल्यास तुमची कामे लवकर होतील, अशी बतावणी करून सर्वसामान्यांना लुबडण्याचे प्रकार होऊशकतात. त्यामुळे संबंधित यंत्रणा कार्यान्वित करणे गरजेचे आहे. यासंदर्भात पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांना विचारणा केली असता लवकरात लवकर हे एलईडी स्क्र ोलिंग डिस्प्ले सुरू करण्यात येईल असे सांगितले.