शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
4
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
5
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
6
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
7
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
8
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
9
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
10
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
11
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
12
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
13
IPL 2026: सुरुवात धमाकेदार, पण 'वैभव'शाली प्रवासाचा दीर्घ पल्ला शिल्लक
14
पाणी हेच पहिले औषध... पण किती आणि केव्हा प्यावे?
15
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
16
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
17
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
18
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
19
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
20
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासींना मिळाला न्याय

By admin | Updated: October 14, 2016 06:46 IST

रानसईमधील आदिवासींची व्यथा ‘लोकमत’ने मांडल्यानंतर शासकीय यंत्रणांनीही गंभीर दखल घेतली आहे. रेशनिंगसाठी सहा किलोमीटर

नवी मुंबई : रानसईमधील आदिवासींची व्यथा ‘लोकमत’ने मांडल्यानंतर शासकीय यंत्रणांनीही गंभीर दखल घेतली आहे. रेशनिंगसाठी सहा किलोमीटर होणारी पायपीट थांबविण्यात आली आहे. यापुढे थेट पाड्यांवर धान्य वाटप केले जाणार असून त्याची सुरवातही केली आहे. उरण तालुक्यामधील सागाची वाडी, खैरकाठी, भुऱ्याची वाडी, मार्गाची वाडी, बंगल्याची वाडी व खोंडावाडी येथील आदिवासींना प्राथमिक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. गावात जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याने येथील आदिवासींना रेशनिंगचे धान्य घेण्यासाठी सहा किलोमीटर चालून चिरनेरमध्ये जावे लागत होते. तेथेही अनेक वेळा पूर्ण धान्य मिळत नसल्याचे लोकमतने निदर्शनास आणून दिले होते.या घटनेची गंभीर दखल उरणच्या तहसीलदार सविता गोडे यांनी घेतली. प्रत्यक्ष पाड्यांवर जावून तेथील नागरिकांशी संवाद सांधला. नागरिकांच्या समस्या समजून घेतल्या. तहसीलदारांनी रानसई येथे जावून आदिवासींना ८५० किलो तांदूळ व ३४२ किलो गहू वाटप केले. ३४२ कार्डधारकांना प्रत्येकी २५ किलो तांदूळ व १० किलो गव्हाचे स्वतंत्र पॅकेट करून त्याचे वितरण केले. तहसीलदार सविता गोडे यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, रानसईमध्ये जाण्यासाठी रस्ता व्यवस्थित नसल्याने तेथे धान्य घेवून जाता येत नसल्याचे दुकानदाराने सांगितले होते. पण आदिवासींना धान्य घेण्यासाठी सहा किलोमीटर चालावे लागू नये यासाठी पाड्यांवरच धान्य वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी पिकअप व्हॅनचा वापर केला जाणार आहे. रॉकेलही पाड्यावरच वितरीत करण्यासाठीच्या सूचना संबंधित दुकानदारांना दिल्या असून या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)