शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस बंदोबस्तात कचरा वाहतूक

By admin | Updated: October 28, 2016 03:58 IST

शहरवासीयांच्या असंतोषामुळे महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये कचऱ्याचे ढीग उचलण्यास सुरवात केली. यानंतरही आंदोलकांची गुंडगिरी सुरूच असून नेरूळ

नवी मुंबई : शहरवासीयांच्या असंतोषामुळे महापालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये कचऱ्याचे ढीग उचलण्यास सुरवात केली. यानंतरही आंदोलकांची गुंडगिरी सुरूच असून नेरूळ व इतर काही ठिकाणी कचरा उचलणाऱ्या कामगारांना मारहाण करण्यात आली. चार महिने पगार मिळाला नसल्याचे कारण देवून शहरातील कंत्राटी कामगारांनी रविवारपासून साफसफाईची कामे थांबविली असून कचरा वाहतूकही बंद केली आहे. कचरा न उचलल्याने शहरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. सोसायट्यांमधील स्थितीही गंभीर झाली आहे. आंदोलन करणाऱ्या कामगारांना आवाहन करूनही संप मागे घेण्यात आला नाही. बुधवारी तुर्भे हनुमाननगर येथे शिवसेना शाखा प्रमुख महेश कोठीवाले व तय्यब पटेल यांनी स्वखर्चाने कचरा उचलण्याचा प्रयत्न करताच आंदोलकांनी तीव्र विरोध केला. कचरा उचलणार नाही व उचलू देणार नाही या भूमिकेमुळे शहरवासीयांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. असंतोषाचा उद्रेक होवू नये यासाठी पालिका प्रशासनाने पोलीस बंदोबस्तामध्ये कचरा उचलण्यास सुरवात केली. दिवसभर ५०० टन कचरा उचलण्यात आला. रात्री उशिरापर्यंत कचरा वाहतूक सुरू होती. कचरा उचलणाऱ्या कर्मचाऱ्यांची काम करण्याची तयारी होती, पण साफसफाई करणाऱ्या कामगारांनी त्यांना काम करण्यास विरोध केला होता. कचऱ्याचे ढीग साचल्याशिवाय आंदोलनाचे परिणाम दिसणार नसल्यामुळे दादागिरी करून कोणालाच काम करू दिले जात नव्हते. गुरूवारीही आंदोलकांनी नेरूळमध्ये काम करणाऱ्या कामगाराला मारहाण केली. एक कामगार जखमी झाला आहे. कोपरखैरणे व बेलापूरमध्येही कचरा उचलण्यावरून संघर्ष निर्माण झाला होता. अखेर पालिका प्रशासनाने विरोध करणाऱ्यांविरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करण्यास सुरवात केल्यामुळे कचरा उचलण्यासाठीचा विरोध कमी झाला. (प्रतिनिधी)कार्यालयात कचरा आंदोलकांनी वाशी विभाग कार्यालयामध्ये कचरा टाकला. याशिवाय शहरातील कचरा कुंड्या उलट्या करून कचरा रस्त्यावर पसरविला. शहरवासीयांची अडवणूक करण्यासाठी हे सर्व प्रकार केल्याने नागरिकांमध्ये कामगारांविषयी असलेली सहानुभूती कमी होवू लागली आहे.