शहरं
Join us  
Trending Stories
1
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
2
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
3
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
4
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
5
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
6
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
7
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
8
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
9
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
10
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
11
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
12
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
13
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव
14
गांगुली-द्रविडनंतर आता साई सुदर्शन! इंग्लंडच्या मैदानात जुळून आला कमालीचा योगायोग
15
Vastu Shastra: लक्ष्मी आणि कुबेराची प्रतिमा असेल जर प्रत्येक घरी, तर सुख वैभव नांदेल दारी!
16
अहमदाबादच्या विमान अपघातातून रमेश वाचले, पण आता घराबाहेर पडणंही झालं कठीण! कारण काय? 
17
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
18
निसा देवगण बॉलिवूडमध्ये करणार पदार्पण? अभिनेत्री काजोल म्हणाली...
19
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
20
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...

गौरी विसर्जनानंतर गौरा उत्सवाची पारंपरिक प्रथा

By admin | Updated: September 12, 2016 03:25 IST

गौरी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी भगवान शंकराचा अवतार समजल्या जाणाऱ्या गौरा देवाची स्थापना करण्याची विभागातील काही गावांमध्ये प्रथा आहे.

नागोठणे : गौरी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी भगवान शंकराचा अवतार समजल्या जाणाऱ्या गौरा देवाची स्थापना करण्याची विभागातील काही गावांमध्ये प्रथा आहे. त्यानुसार विभागातील वेलशेत गावातील हनुमान मंदिरात रविवारी श्री गौरा उत्सव धार्मिक वातावरणात मोठया जल्लोषात पार पडला. इंग्रज काळापासून हा गौरा उत्सव या गावात साजरा केला जात असून गौरी विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या दरम्यान या गौरा देवाची स्थापना करण्याची परंपरा आहे. दिवसभर विविध कार्यक्र म घेण्यात येतात व सायंकाळी गौराची मिरवणूक गावात फिरविण्यात येते, त्याच दिवशी रात्री अंबा नदीत त्याचे भावपूर्ण विसर्जन करण्यात येते अशी माहिती सुधाकर पारंगे आणि संतोष कोळी यांनी दिली. या उत्सवाचे निमित्ताने वेलशेत येथील महिला मंडळासह श्री बिहरेश्वर महिला नाच मंडळ ( शिहू ), महिला नाच मंडळ (शेतजुई ), श्री जौरु आई महिला नाच मंडळ (बेणसेवाडी), महिला नाच मंडळ, शिहू आदी मंडळांच्या नाचांचे सामने घेण्यात आले. गाव समितीचे अध्यक्ष तथा पिगोंडे ग्रामपंचायत सदस्य सुधाकर पारंगें यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या उत्सवासाठी ग्रामपंचायत सदस्य संतोष कोळी, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष रोशन पारंगे, विजय पारंगे, राजेंद्र ताडकर, अनिल पाटील आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. वेलशेत आयपीसीएल प्रकल्पग्रस्त गाव आहे. पूर्वी या गावाला मांडवा व पिगोंडे हे नाव होते, मात्र आता वेलशेत हे नाव प्रचिलत झाले आहे. (वार्ताहर)