शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
6
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
7
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
8
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
9
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
10
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
11
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
12
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
13
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
14
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
15
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
16
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
17
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
18
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
19
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
20
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
Daily Top 2Weekly Top 5

नगर परिषदेचा शिलकी अर्थसंकल्प

By admin | Updated: March 1, 2016 02:45 IST

कोणतीही करवाढ नसलेल्या महाड नगर परिषदेच्या २०१६-१७च्या २ लाख ६० हजार रुपये शिलकी अर्थसंकल्पाला सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

महाड : कोणतीही करवाढ नसलेल्या महाड नगर परिषदेच्या २०१६-१७च्या २ लाख ६० हजार रुपये शिलकी अर्थसंकल्पाला सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. नगराध्यक्ष सुनील कविस्कर यांनी हा अर्थसंकल्प सादर केला.या अर्थसंकल्पामध्ये प्रारंभी शिल्लक ६ कोटी ३८ लाख ५० हजार ३४६ रुपये व २०१६-१७ मधील अंदाजित जमा १६ कोटी २० लाख ९० हजार ५०० रुपये असा खर्च वजा जाता २ लाख ६० हजार २४६ रुपये शिल्लक राहणार आहेत. नगर परिषदेच्या या अर्थसंकल्पात सामान्य प्रशासन, सार्वजनिक सुरक्षा, रस्त्यावरील दिवाबत्ती, आरोग्य खाते, उद्याने, शिक्षण, सार्वजनिक सोईसुविधा या बाबींवर तरतूद करण्यात आलेली आहे. एलईडी पथदिव्यांसाठी ३० लाख रुपयांची तरतूद या अर्थसंकल्पात आहे. त्याचबरोबर समाजातील दुर्बल घटक, अपंग कल्याणासाठी तर सामाजिक व सेवाभावी संस्थेसाठी प्रोत्साहनपर अनुदान देण्याची तरतूद या करण्यात आलेली आहे. शहर विकास, बागा व उद्याने विकास यावरही पालिकेने भर दिला आहे. या सभेत महाड औद्योगिक वसाहतींकडून नगर परिषदेला केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठा बिलापोटी दिवसेंदिवस थकबाकी वाढतच असून ती आता ९ कोटी रुपये झाल्याची बाब शिवसेनेचे नगरसेवक बिपीन म्हामुणकर आणि नितीन आते यांनी लक्षात आणून दिली. या देणे असलेल्या थकबाकीसाठी नगर परिषदेने अर्थसंकल्पामध्ये कुठलीही तरतूद केली नसल्याचे निदर्शनास आणून दिले. (वार्ताहर)> अलिबागकरांना कोणतीही करवाढ नाही१अलिबाग : अलिबाग नगरपरिषदेचा २०१५-२०१६ चा सुधारित व आगामी २०१६-२०१७ वर्षाचे अर्थसंकल्पीय अंदाजपत्रक यांचा समावेश असलेल्या ४४ कोटी ७५ लाख ७८ हजार ९७० रुपयांच्या अलिबाग नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पास सोमवारी नगरपरिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभेत मांडून त्यास मंजुरी देण्यात आली आहे. नगराध्यक्ष प्रशांत मधुुसूदन नाईक यांच्या अध्यक्षखाली सभा झाली. २अर्थसंकल्पात अलिबागच्या नागरिकांवर कोणत्याही स्वरूपातील कर वा आर्थिक बोजा टाकला नाही. अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात महसुली उत्पन्नापासून १६ कोटी ८२ लाख, भांडवली अनुदानातून १२ कोटी २४ लाख व इतर उत्पन्नातून ४ कोटी ३ लाख रुपये अपेक्षित आहेत. नगरपरिषदेस शासनाकडून वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत २ कोटी रुपये मिळणार आहेत. यामधून श्रीबाग नं. २ क्रीडा संकुलाचे काम करण्यात येणार आहे. ३जिल्हा न्यायालयाच्या समोर व जिल्हा रुग्णालयाच्या समोरील मोकळ्या जागेचा विकास करून पे अ‍ॅन्ड पार्क सुरू करण्यात येणार आहे. यापासून नगरपरिषदेच्या उत्पन्नात भर पडणार आहे. पी.एन.पी. नगर येथे नवीन भाजी मार्केटचे बांधकाम करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या विशेष सभेस उपनगराध्यक्षा सुरक्षा शाहर् आदींसह अधिकारीउपस्थित होते.