शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मुरु डला पर्यटकांची गर्दी

By admin | Updated: May 29, 2017 06:31 IST

शनिवार व रविवार सलग सुट्यांचा सिझन आल्याने मुंबई, ठाणे तसेच पुणे या भागातून प्रचंड संख्येने पर्यटकांनी मुरुडचा सागरी

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव/ मुरुड : शनिवार व रविवार सलग सुट्यांचा सिझन आल्याने मुंबई, ठाणे तसेच पुणे या भागातून प्रचंड संख्येने पर्यटकांनी मुरुडचा सागरी किनारा गाठला आहे. स्वत:चे चारचाकी वाहन घेऊन आल्याने शनिवार व रविवारी मुरु ड समुद्रकिनारी वाहनांच्या मोठ्या रांगा निदर्शनास आल्या. त्यामुळे तुरळक प्रमाणात वाहतूककोंडी सुद्धा झाली होती. या दोन दिवसांत शहरातील सर्व लॉज तसेच हॉटेल तुडुंब भरलेले दिसून आले. सकाळपासूनच समुद्र स्नान घेताना अनेक पर्यटक दिसून आले.मुरु डसह काशिद समुद्रकिनारी मोठी गर्दी दिसून आली. बहुतांशी पर्यटकांनी उंट सफारी, तसेच वाळूवर चालणाऱ्या गाड्या, पॅरॉग्लायडिंग, बनाना बोटीचा आनंद घेताना दिसून आले. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरील व्यावसायिकांचा धंदा तेजीत दिसून आला. मुरु ड व काशिदला येण्याअगोदरच राहण्याची बुकिंग केल्यामुळे सर्व पर्यटकांना राहण्याची व्यवस्था झाली होती. थोडक्यात बहुतांशी पर्यटकांनी समुद्रकिनारी भेट दिल्याने कोकणातील सर्व समुद्र किनारे पर्यटकांनी तुडुंब भरले होते. या पर्यटनामुळे स्वयंरोजगाराला चालना मिळून आर्थिक सुबत्ता प्राप्त होताना दिसून येत आहे. प्रचंड संख्येने पर्यटक आल्याने समुद्र किनारा फु लला होता. फणसाडमध्ये फिरण्यासाठी गाडीची मागणी१मुरु ड तालुक्यातील फणसाड अभयारण्य हे ५४ चौरस किलोमीटर अंतरावर पसरले असून येथे अनेक वन्यजीव वास्तव्य करून आहेत.परंतु या अभयारण्यात एप्रिल व मे महिन्यात असंख्य पर्यटक येत असतात, परंतु त्यांना पायी चालून हे अरण्य पहावे लागते.या अभयारण्याचे क्षेत्र खूप मोठे असल्याने चालून चालून पर्यटक खूप वैतागत आहेत.त्यामुळे या अभयारण्य पाहण्यासाठी पर्यटकांना खास गाड्यांची व्यवस्था करावी अशी पर्यटकांची मागणी आहे. २फिरण्यासाठी मिळणाऱ्या गाडीचे अतिरिक्त शुल्क भरावयास तयार असल्याची खात्री सुद्धा पर्यटकांनी दिली आहे. फणसाड अभयारण्याचे वनक्षेत्रपाल सुलेमान तडवी यांच्याशी संपर्कसाधला असता ते म्हणाले की, फणसाड अभयारण्य पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक येत आहेत. सुमारे ५४ चौरस किलोमीटरचे क्षेत्र असल्याने साहजिकच पर्यटकांची मागणी ही रास्त आहे. परंतु वरिष्ठ कार्यालयाकडून कार्यवाही झाल्यास ही मागणी मंजूर होणार आहे. पर्यटकांची मागणी लेखी स्वरूपात वरिष्ठ कार्यालयास कळवली जाईल व याचा पाठपुरावा सुद्धा करू. जर का गाडीसाठी ठोस निर्णय घेण्यात आला तर याचा येथील पर्यटकांना मोठा फायदा निश्चित होईल असा विश्वास तडवी यांनी व्यक्त केला आहे.