शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार

By admin | Updated: February 15, 2016 03:06 IST

रायगड जिल्ह्यातील चार ठिकाणी अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. पैकी दोन घटनांमध्ये दोन पीडित या गर्भवती राहिल्याने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील चार ठिकाणी अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत. पैकी दोन घटनांमध्ये दोन पीडित या गर्भवती राहिल्याने अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अत्याचार करणाऱ्या नराधमांना कायद्याचा धाक राहिला नसल्याने जिल्ह्यातील कायदा, सुव्यवस्था आणि सुरक्षितता पुरती कोलमडून पडल्याचे दिसून येते.पेण येथील दादर सागरी पोलीस ठाणे हद्दीतील एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर जानेवारी ते आॅक्टोबर २०१५ या कालावधीत अत्याचार करण्यात आले होते. त्यामुळे ती पीडित अल्पवयीन मुलगी आठ महिन्यांची गर्भवती राहिली आहे. मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला ती मुलगी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही त्याने हे कृत्य केल्याचे मुलीच्या आईने फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद दादर सागरी पोलीस ठाण्यात आहे. खालापूर तालुक्यातील वाशिवली येथील उल्पवयीन मुलीला फूस लावून सहा महिन्यांपूर्वीपासून ते १२ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले असून, या घटनेची नोंद रसायनी पोलीस ठाण्यात झाली आहे. अलिबाग तालुक्यातील बांधण येथे राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवरही शारीरिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. या मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केले. पीडितेच्या आईवडिलांना मारण्याची धमकी आरोपीने दिली होती, अशी माहिती फिर्यादीने पोलिसांना दिली आहे. पीडित मुलगी आता नऊ महिन्यांची गर्भवती आहे.(प्रतिनिधी)