शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

आज होणार आदर्श शिक्षकांचा गौरव

By admin | Updated: August 31, 2016 03:24 IST

पनवेल तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा गौरव सोहळा मान्यवरांच्या हस्ते बुधवार, ३१ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे.

पनवेल : पनवेल तालुक्यातील आदर्श शिक्षकांचा गौरव सोहळा मान्यवरांच्या हस्ते बुधवार, ३१ आॅगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात होणार आहे. ‘लोकमत’ आणि श्री. रामशेठ ठाकूर विकास मंडळाच्या वतीने यंदा प्रथमच शिक्षकांचा सत्कार करण्यात येणार आहे. त्यामुळे या सोहळ्याचे आकर्षण प्रत्येक शिक्षकाला वाटत आहे. ‘लोकमत’ व श्री. रामशेठ ठाकूर विकास मंडळ आयोजित, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्र व दीपक फर्टिलायझर व पेट्रोकेमिकल कार्पोरेशन लिमिटेड पुरस्कृत ‘आदर्श शिक्षक पुरस्कार २०१६’प्रदान करण्यात येणार आहेत. पनवेल तालुक्यातील १०० शाळांतून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील शिक्षकांमध्येही पुरस्काराबद्दल उत्सुकता आहे. कार्यक्रमाला श्री. रामशेठ ठाकूर मित्र मंडळाचे संस्थापक माजी खासदार रामशेठ ठाकूर, विधान परिषदेतील शिक्षक आमदार रामनाथ मोते, पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठान महाराष्ट्रचे अध्यक्ष संजय सोनावणे, दीपक फर्टिलायझर व पेट्रोकेमिकल कार्पोरेशन लिमिटेडचे अध्यक्ष परेश त्रिवेदी व उपाध्यक्ष श्रीपाद लेले, पनवेलच्या नगराध्यक्षा चारुशीला घरत उपस्थित राहणार आहेत. पुरस्कार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.