शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

प्रवाशाला चालत्या रेल्वेतून फेकले

By admin | Updated: September 7, 2016 03:13 IST

रेल्वे प्रवाशाला लुबाडून चालत्या रेल्वेतून फेकून दिल्याचा प्रकार सीबीडी स्थानकालगत घडला आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी जबाबदारी झटकत जखमीची सुमारे दोन तास हेळसांड केली.

नवी मुंबई : रेल्वे प्रवाशाला लुबाडून चालत्या रेल्वेतून फेकून दिल्याचा प्रकार सीबीडी स्थानकालगत घडला आहे. विशेष म्हणजे या घटनेनंतर रेल्वे पोलिसांनी जबाबदारी झटकत जखमीची सुमारे दोन तास हेळसांड केली. पनवेलऐवजी वाशी हद्दीत घटना घडल्याचे सांगितले तरच मदत मिळेल या अटीवर सीबीडी पोलिसांनी रुग्णालयात दाखल केल्याचाही आरोप या प्रवाशाने केला आहे.ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर एका घटनेत बेलापूरचे रहिवासी गिरीधारी मसंता (४५) यांचे थोडक्यात प्राण बचावले आहेत. या घटनेमुळे रेल्वे पोलीस जबाबदारी ढकलण्याच्या प्रयत्नात प्रवाशांच्या जिवाशी देखील खेळ करत असल्याचे समोर आले आहे. २० आॅगस्टच्या रात्री ते पनवेल लोकलने ऐरोली येथून बेलापूरच्या दिशेने चालले होते. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास ही लोकल नेरुळ स्थानकात आली असता मसंता ज्या डब्यात बसले होते त्यामधील इतर सर्व प्रवासी खाली उतरले. यावेळी ते एकटेच असताना अज्ञात तिघे जण त्या डब्यामध्ये आले. सीवूड स्थानक गेल्यानंतर त्या तिघांनी मसंता यांना मारहाण करत लुटायला सुरवात केली. प्रथम त्यांनी प्रतिकार केला असता तिघांपैकी एकाने त्यांच्या गळ्याला चाकू लावला. शिवाय हातातली अंगठी निघत नसल्यामुळे वेळ पडल्यास बोटे तोडण्याची धमकी दिली. अखेर भीतीपोटी मसंता यांनी त्यांचा मार सहन करत स्वत:कडील दागिने, रोख रक्कम व मोबाइल तसेच बॅग त्या तिघांकडे सुपूर्द केली. त्यानंतर सीबीडी स्थानकापूर्वी पुलालगत त्या तिघांनी मसंता यांना उचलून चालत्या रेल्वेतून खाली फेकून दिले.यामध्ये गंभीर जखमी झालेल्या मसंता यांनी जवळचे सीबीडी स्थानक गाठले. परंतु त्याठिकाणी रेल्वे पोलिसांकडून मदतीऐवजी त्यांची असंवेदनशीलता अनुभवायला मिळाली. तुमच्याकडे उपचारासाठी पैसे असतील तरच रुग्णालयात नेतो असे बजावत सुमारे दीड तास त्यांना बसवून ठेवले. अखेर एका मोटरमनने मसंता यांची अवस्था पाहून स्वत:कडील ३०० रुपये देवून तत्काळ रुग्णालयात जाण्यास सुचवले. त्यानंतरही सुमारे अर्ध्या तासाने रेल्वेने वाशीला व तिथून पालिका रुग्णालयात नेल्याचे गिरीधारी मसंता यांनी सांगितले. परंतु रुग्णालयातही पूर्ण उपचार न घेवू देता काही मिनिटांतच वाशी रेल्वेस्थानकात आणून घटना वाशी हद्दीतलीच आहे असे सांगण्याचा दम देत तक्रारीमध्ये तसे नमूद करून घेतल्याचा आरोप मसंता यांनी केला आहे.