पेण : स्वच्छ भारत अभियानास 2 ऑक्टोबरपासून देशपातळीवर धूमधडाक्यात सुरुवात झाली खरी, मात्र आजही खेडय़ातील भारत अस्वच्छतेच्या गर्तेत अडकला आहे. अस्वच्छता दूर कोणी करायची, कच:यांचे ढीग कोणी उचलायचे, यासाठी ग्राम प्रशासन व जनतेत एकसंधता नसल्याने या अस्वच्छतेमुळे तापाच्या साथीत बळी जात आहेत. गेल्यावर्षी 16 बळी गेले. यावर्षी सुरुवातीलाच 3 जणांचा मृत्यू झाल्याने अस्वच्छता हीच सामाजिक स्वास्थ्य बिघडविण्यास कारणीभूत ठरल्याचे चित्र पेणमध्ये आहे.
गावचा व शहरांचा घनकचरा दिवसेंदिवस वाढत आहे. आणि यातूनच साथीच्या रोगांची लागण होताना दिसत आहे. पेणच्या मळेघर गावात भीमाबाई म्हात्रे (56) व रेश्मा मोकल (32) तर उचेडे गावातील बाळाजी परशुराम म्हात्रे (56) या तीन रुग्णांचा तापसदृश्य साथीने मृत्यू झाला.
मळेघर गावात सांडपाणी व कच:याचे ढीग जागोजागी आढळले. गावाच्या शेजारी असलेल्या परिसरातील अस्वच्छता, त्याचबरोबरीने काश्मिरे गावातही असेच कच:याचे ढीग पसरले आहेत. स्वच्छता कोणी करायची, हा प्रश्न ऐरणीवरचा आहे. ग्रामपंचायत, तेथील लोकप्रतिनिधी गावकरी यांच्या एकत्रित सहभागाचा प्रश्न असूनही जोतो जबाबदारी झटकताना दिसत आहे. आरोग्य यंत्रणा गावात गेले दोन दिवस तळ ठोकून आहे. वाशी आरोग्य केंद्राच्या डॉ. आरती माने, आरोग्य सुपरवायझर एन. एल. पाटील, के. जी. भोईर, डी. पी. म्हात्रे व अन्य अशा आठ कर्मचारीवर्गाने 174 घरांना भेटी देवून प्रतिबंधक औषधाचे वाटप केले आहे. 1क् रुग्णांचे रक्त नमुने तपासणीसाठी ठाणो येथे पाठविले. 13 रुग्णांवर उपचार झाले आहे.
सगळीकडे कचरा
या परिसरात फेरफटका मारला असता जागोजागची अस्वच्छता लक्ष वेधून घेत आहे. गावे स्वच्छ व्हावीत यासाठी गावानेच पुढाकार घ्यावा. ग्रामपंचायतीने यासाठी गावाला विश्वासात घेणो ही काळाची गरज व्हावी. आपले सामाजिक स्वास्थ्य अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करणो आवश्यक आहे.