शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या पनवेल महापालिकेच्या तीन अधिकाऱ्यांना ठोठावला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 01:12 IST

४ सप्टेंबर २०१८ साली अर्ज करून प्रभाग अधिकारी आणि जनमाहिती अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला होता. माहिती मिळाली नाही म्हणून प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला.

पनवेल : पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांना राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाने ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. कारवाई करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये प्रभाग अधिकारी आणि अभियंत्याचा समावेश आहे. पनवेल महापालिकेत अनेक माहिती अधिकाराचे अर्ज थकीत आहेत. दिलेल्या मुदतीत माहिती दिली जात नाही. कामोठ्यातील रहिवासी  सुनील शिरीषकर यांनी पनवेल महापालिका क्षेत्रातील नगरसेवक आणि त्यांच्या नातेवाइकांची  बेकायदा बांधकामाची माहिती मागवली होती. २

४ सप्टेंबर २०१८ साली अर्ज करून प्रभाग अधिकारी आणि जनमाहिती अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला होता. माहिती मिळाली नाही म्हणून प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांकडे अर्ज करण्यात आला. ड प्रभागाकडून त्यांना आवश्यक माहिती देण्यात आली; मात्र अपिलीय अधिकाऱ्याकडे अर्ज करून ३० दिवसांची मुदत दिल्यानंतर अ प्रभाग अधिकारी भगवान पाटील यांनी खुलासा केला; मात्र क प्रभागाचे अधिकारी जयराम पादीर आणि ब प्रभागाचे अधिकारी हरिश्चंद्र कडू यांनी मात्र माहिती दिली नाही. माहिती का पुरविली नाही म्हणून ३० दिवसांत खुलासा करण्याचे आदेश राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त के. बिश्नोई यांनी दिले होते. त्यांच्या आदेशाचे पालन न करता कोणतेच उत्तर या प्रभाग अधिकाऱ्यांनी न दिल्यामुळे त्या दोघांना प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड करण्याचा आदेश नुकताच देण्यात आला.  माहिती अधिकार अधिनियम कलम २० नुसार त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून, संबंधित दंडाची रक्कम अधिकाऱ्यांच्या वेतनातून  वळती करण्यात यावी, असा आदेश दिला आहे.तक्का गावातील रहिवाशी गणेश वाघिलकर यांनीदेखील तक्का गावातील एका मोबाइल टॉवरच्या परवानगीच्या कागदपत्रांची माहिती मागवली होती. ही माहितीदेखील देण्यात न आल्यामुळे बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता जनमाहिती अधिकारी सुधीर साळुंखे यांनादेखील अशाच प्रकारे ५ हजार रुपयांचा दंड लावण्यात आला आहे.

इतर अधिकाऱ्यांना धडामाहिती अधिकारात माहिती देण्यास अनेक वेळा टाळाटाळ केली जाते. अशा वेळी अर्जदाराचा वेळदेखील वाया जात असतो. दंडाच्या निर्णयामुळे इतर अधिकाऱ्यांना धडा मिळेल, असे गणेश वाघीलकर यांनी सांगितले.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल