शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेरुळावर शिडी ठेवणा-या तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:16 IST

व्यसनाचा खर्च भागविण्यासाठी चोरलेली शिडी तोडण्याकरिता रेल्वेरुळावर ठेवणाºया तिघांना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. तिघेही अल्पवयीन असून झोपडपट्टीत राहणारे आहेत.

नवी मुंबई : व्यसनाचा खर्च भागविण्यासाठी चोरलेली शिडी तोडण्याकरिता रेल्वेरुळावर ठेवणाºया तिघांना रेल्वे सुरक्षा दलाने अटक केली आहे. तिघेही अल्पवयीन असून झोपडपट्टीत राहणारे आहेत. त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली असून, त्यांच्या कृत्यामुळे रेल्वेप्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला होता.ठाणे-वाशी रेल्वेमार्गावर महापे पुलाखाली शुक्रवारी सकाळी हा प्रकार घडला. वाशीच्या दिशेने जाणाºया रेल्वेमार्गावर रुळावर शिडी असल्याचे मोटरमनच्या निदर्शनास आले. संभाव्य दुर्घटना टाळण्याकरिता प्रसंग सावधानता बाळगत, त्याने रेल्वे थांबवून रुळावरील शिडी हटवली. यानंतर, मोटरमनने सदर प्रकाराची माहिती रेल्वेसुरक्षा दलाच्या (आरपीएफ) तुर्भे विभागाला दिली होती. त्यानुसार, आरपीएफचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त सचिन भालोदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक लोकेश सागर यांनी तपासाला सुरुवात केली होती. आरपीएफ कर्मचारी रामअशिष यादव, नीलेश दळवी व किसन सिंग यांना तत्काळ तपासाचे आदेश देण्यात आले होते. या वेळी कोपरखैरणे स्थानकापासून काही अंतरावर रुळावरून तिघे जण शिडी घेऊन येत असल्याचे आरपीएफ कर्मचाºयांच्या निदर्शनास आले. त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता, दोघे जण पळून गेले, तर एक जण त्यांच्या हाती लागला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीअंती शनिवारी इतर दोघांनाही पकडण्यात आले असून, दोघे जण सख्खे भाऊ असल्याचे आरपीएफचे निरीक्षक लोकेश सागर यांनी सांगितले.तिघेही १० ते १६ वयोगटातले असून, व्यसनाच्या अधीन झालेले आहेत. त्यानुसार, व्यसनाचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी कोपरखैरणेतील एका हॉटेलबाहेरून अ‍ॅल्युमिनिअमची शिडी चोरली होती, परंतु चोरलेली शिडी जड असल्यामुळे ती तोडण्याकरिता ते महापे पुलाखाली आले होते. त्या ठिकाणी शिडी तोडण्याचा प्रयत्न करूनही न तुटल्याने त्यांनी ती रेल्वेरुळावर ठेवली. प्रथम रुळाच्या एकाच भागावर त्यांनी शिडी ठेवल्याने ती तुटली नाही.मोटरमनलाही रुळावरील शिडी निदर्शनास आली नाही. मात्र त्यानंतर, तिघांनी सुमारे १७ फूट लांबीची शिडी दोन्ही रुळावर आडवी ठेवली असता, दुसºया मोटरमनचे लक्ष गेले. त्याने रेल्वे सुरक्षा दलाला त्याची माहिती दिली. मोटरमनच्या या सावधानतेमुळे संभाव्य मोठा रेल्वेअपघात टळल्याची भावना, आरपीएफचे निरीक्षक लोकेश सागर यांनी व्यक्त केली आहे.मोटरमनच्या प्रसंगावधानामुळे अपघात टळलामोटरमनलाही रुळावरील शिडी निदर्शनास आली नाही. मात्र, त्यानंतर तिघांनी सुमारे १७ फूट लांबीची शिडी दोन्ही रुळावर आडवी ठेवली असता, दुसºया मोटरमनचे लक्ष गेले. त्याने रेल्वे सुरक्षा दलाला त्याची माहिती दिली. मोटरमनच्या या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठा रेल्वेअपघात टळला़