शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

बंदी झुगारून हजारो पर्यटक पांडवकड्यावर दाखल

By admin | Updated: June 26, 2017 01:38 IST

पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर खारघर शहरातील प्रसिद्ध पांडवकडा धबधबा धो धो वाहण्यास सुरुवात झाली आहे. वन विभागाने यंदाही सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना

वैभव गायकर । लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर खारघर शहरातील प्रसिद्ध पांडवकडा धबधबा धो धो वाहण्यास सुरुवात झाली आहे. वन विभागाने यंदाही सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेशबंदी केली आहे. मात्र, पर्यटकांनी पहिल्या पावसातच बंदी झुगारून रविवारी धबधब्यावर मोठी गर्दी केली होती.आजवर शेकडो पर्यटकांच्या जीवावर बेतलेल्या या धबधब्यावर वन विभागाने बंदी घातली आहे. पर्यटकांची सुरक्षा धोक्यात येऊ नये, म्हणून ही बंदी घालण्यात आली आहे. याकरिता सुरक्षा भिंत बांधण्याचे काम वनविभागाने सुरू केले आहे. मात्र, धोका लक्षात न घेता, पहिल्याच दिवशी पर्यटकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. सुमारे १००पेक्षा जास्त फूट उंचावरून कोसळणाऱ्या या धबधब्यात मनमुराद भिजण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही. या ठिकाणी मुंबई, उपनगरांसह, ठाणे, कल्याण, भिवंडी, या शहरांमधून पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. वनविभाग अथवा खारघर पोलिसांच्या वतीने कोणतीही सुरक्षा या ठिकाणी ठेवण्यात आली नसल्याने पर्यटकांनी या ठिकाणी प्रवेश केला.शनिवारी सायंकाळपासून सुरू असलेला पाऊस रविवारीही कोसळत होता. पांडवकड्यावर कोणतीही पोलीस यंत्रणा अथवा वनविभागाकडून सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळे पर्यटकांनी धबधब्यात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला. पर्यटकांना थांबवण्यासाठी कोणतीच यंत्रणा या ठिकाणी नसल्याने बंदीचे नियम अनेकांनी पायदळी तुडवले.