शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात हजार बोअरवेल

By admin | Updated: April 4, 2016 02:02 IST

शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिका व नागरिकांनी एका महिन्यात एक हजारापेक्षा जास्त बोअरवेल व हातपंप खोदले आहेत. यामुळे जमिनीची अक्षरश: चाळण झाली

उल्हासनगर : शहरातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पालिका व नागरिकांनी एका महिन्यात एक हजारापेक्षा जास्त बोअरवेल व हातपंप खोदले आहेत. यामुळे जमिनीची अक्षरश: चाळण झाली असून भूगर्भातील पाण्याची पातळी ४०० फुटांपर्यंत गेली आहे. तर, अनेक ठिकाणी बोअरवेलला पाणीच लागत नसल्याने एप्रिल-मे महिन्यांत पाणीटंचाईची सर्वाधिक झळ बसण्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिकेकडे पाण्याचा पर्यायी स्रोत नसल्याने त्यांना एमआयडीसीच्या मनमानी कारभारावर अवलंबून राहावे लागत आहे. पालिका आयुक्त मनोहर हिरे यांनी टंचाईची झळ कमी करण्यासाठी जुन्या बोअरवेल व हातपंपांची दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहे. तसेच प्रत्येक प्रभागात तीन बोअरवेल खोदण्याला मान्यता दिली. मात्र, नागरिकांच्या मागणीनुसार एका प्रभागात सहापेक्षा जास्त बोअरवेल खोदण्यात येत आहे. पालिकेने एका महिन्यात ३०० पेक्षा जास्त तर लहान-मोठ्या कारखान्यांनी ७०० पेक्षा जास्त बोअरवेल खोदल्याची चर्चा आहे. >शहरातून बारमाही वाहणारी उल्हास नदी आहे. अशा वेळी नदीपात्रातून पाणी न उचलता किनारी बोअरवेल खोदून त्याद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्याची मागणी आयुक्तांकडे होत आहे. नदीकिनाऱ्यावरील पाणी पिण्यास योग्य असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले असून स्वत:चा पाणीस्रोत उभारण्याची मागणी पालिकेकडे होत आहे. नवीन बोअरवेल व हातपंप खोदण्यावर पालिकेने वेळीच निर्बंध न घातल्यास भूगर्भातील पाणीपातळी ४०० फुटांपेक्षा जास्त खोल जाईल, असे तज्ज्ञ सांगत आहेत. > मनसेचे शहराध्यक्ष प्रदीप गोडसे यांनी नवीन बोअरवेल व हातपंप खोदण्याऐवजी जुन्यांची दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. बहुतांश नवीन बोअरवेलला पाणी लागत नसल्याने पालिकेचे लाखो रुपये पाण्यात जात आहेत. मात्र, ज्या जुन्या बोअरवेल व हातपंपांना मुबलक पाणी आहे, त्यांची दुरुस्ती केल्यास टंचाईग्रस्त नागरिकांना दिलासा मिळेल. पालिकेने वेळीच कारवाई सुरू न केल्यास आंदोलनाचे शस्त्र पुुन्हा हाती घ्यावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.