शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

वाशीत योगशिबिराला हजारोंची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2019 00:40 IST

वीर भद्रासन करण्याच्या जागतिक विक्र माचा प्रयत्न

नवी मुंबई : पाचव्या आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त वाशीतील सिडको प्रदर्शन केंद्रात सिडको आर्ट आॅफ लिव्हिंग आणि नवी मुंबई सिटिझन फाउंडेशन या संस्थांच्या माध्यमातून शुक्र वार, २१ जून रोजी योगदिन कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. आर्ट आॅफ लिव्हिंग या संस्थेमार्फत उपस्थितांकडून सलग तीन मिनिटे ‘वीर भद्रासन’ करून घेऊन जागतिक विक्रम करण्याचा प्रयत्न करण्यात आला.संयुक्त राष्ट्र संघाने २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगदिन जाहीर केल्यावर सन २०१५ पासून हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ म्हणून साजरा केला जातो. सध्याच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात उत्तम आरोग्य आणि मनस्वास्थासाठी योगा केला जातो. नवी मुंबई शहरातील नागरिकांमध्येही योगविद्येचा प्रचार व्हावा व त्यायोगे आरोग्य प्राप्त व्हावे, यासाठी सिडकोच्या वतीनेही २०१५ सालापासून वाशीत योगदिन या कार्यक्र माचे आयोजन केले जाते. या वर्षीच्या कार्यक्र मात आर्ट आॅफ लिव्हिंग आणि नवी मुंबई सिटिझन फाउंडेशन या संस्थेमार्फत उपस्थित नागरिकांना विविध योगासने, प्राणायाम, सूर्यनमस्कार इत्यादीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. तसेच या सर्व योगा प्रकारांची प्रात्यक्षिके करवून घेण्यात आली. या कार्यक्र माच्या निमित्ताने सिडकोचे अध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदा म्हात्रे, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, भाजपचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत, विविध संस्थांचे सदस्य, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी, तरु ण तरु णी, ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.रिक्षाचालकांना आरोग्य विम्याचे वाटपदगदगीच्या जीवनात रिक्षाचालकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून त्यांना एखादा आजार जडल्यास त्यावर होणाऱ्या उपचारासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागते. या कार्यक्र माच्या निमित्ताने रिक्षाचालकांना पंतप्रधान आरोग्य विम्याचे वाटप करण्यात आले.कांशीरामजी महाविद्यालयात योगदिनरबाळे येथील कांशीरामजी महाविद्यालयात जागतिक योगदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देत त्यांच्याकडून प्रात्यक्षिके करवून घेण्यात आली. माजी महापौर सुधाकर सोनावणे, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.विद्या प्रसारक हायस्कूलमध्ये योगासनेधावपळीच्या जीवनात शारीरिक आणि मानसिक व्याधींना दूर ठेवण्यासाठी योगा हा एकमेव पर्याय असून, याबाबत विद्यार्थ्यांनाही माहिती व्हावी यासाठी बेलापूरमधील विद्या प्रसारक हायस्कूलमध्ये योगा कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्र माला शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :International Yoga Dayआंतरराष्ट्रीय योग दिन