शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
4
नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
5
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
6
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
7
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
8
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
9
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
10
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
11
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
12
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
13
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
14
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
15
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
16
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
17
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
18
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
19
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
20
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
Daily Top 2Weekly Top 5

शिल्लक घरांच्या विक्रीला दसऱ्याचा मुहूर्त

By admin | Updated: October 11, 2016 03:43 IST

खासगी विकासकांप्रमाणे सिडकोनेही आपल्या विविध प्रकल्पांतील शिल्लक घरांच्या विक्रीसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधला आहे

नवी मुंबई : खासगी विकासकांप्रमाणे सिडकोनेही आपल्या विविध प्रकल्पांतील शिल्लक घरांच्या विक्रीसाठी दसऱ्याचा मुहूर्त साधला आहे. त्यानुसार खारघर व उलवे येथील गृहप्रकल्पात विक्रीविना पडून असलेल्या ४00 सदनिकांची पुन्हा सोडत काढण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. गेल्या काही वर्षांत जमिनीच्या किमती गगनाला भिडल्याने स्वस्त व परवडणारी घरे बांधणे विकासकांना अवघड होवून बसले आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे बजेटमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या सर्वसामान्य ग्राहकांची परवड होत आहे. असे असले तरी सिडकोच्या घरांना नेहमीच ग्राहकांची पसंती राहिली आहे. त्यामुळे ग्राहक सिडकोच्या आगामी गृहप्रकल्पाकडे डोळे लावून बसले आहेत. परंतु अशा ग्राहकांना सिडकोने दसऱ्याच्या मुहूर्तावर घर खरेदीची आणखी एक संधी उपलब्ध करून दिली आहे. खारघर येथील व्हॅलिशिल्प, वास्तुविहार,सेलिब्रेशन आणि उलवे येथील उन्नती गृहप्रकल्पातील ४00 घरे विक्रीविना पडून आहेत. सिडकोने जाहीर केल्याप्रमाणे या घरांची किंमत कमीत कमी १३ लाख व जास्तीत जास्त १ कोटी ४७ लाख रुपये इतकी आहे. विशेष म्हणजे ही घरे विविध आरक्षण संवर्गातील आहेत. खारघर सेक्टर १५ येथे सहा वर्षांपूर्वी उभारलेल्या वास्तुविहार आणि सेलिब्रेशन गृहप्रकल्पात विविध क्षेत्रफळांची एकूण ९४ घरे शिल्लक आहेत. विविध प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या घरांची किंमत घराच्या क्षेत्रफळानुसार १२ लाख ते ७८ लाख रुपये इतकी आहे. उलवे येथील उन्नती गृहप्रकल्पात यूएल-१ टाईपची ६0 तर यूएल-२ टाईपची १४ घरे शिल्लक आहेत. या घरांची किमत १३ ते २५ लाखांच्या दरम्यान आहे. (प्रतिनिधी)