शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

अपंग नागरिकास अद्यापि न्याय नाही

By admin | Updated: September 1, 2016 03:34 IST

अपंगांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या सोमनाथ चौघुले यांच्या वाहन नोंदणी शुल्काचा प्रश्न सोडविण्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास अपयश आले आहे.

नवी मुंबई : अपंगांच्या प्रश्नांसाठी झटणाऱ्या सोमनाथ चौघुले यांच्या वाहन नोंदणी शुल्काचा प्रश्न सोडविण्यास उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास अपयश आले आहे. एक महिन्यानंतरही अद्याप त्यांनी जमा केलेली रक्कम त्यांना परत मिळालेली नाही. फक्त आश्वासनांवर बोळवण होत असल्यामुळे अपंग नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. अपंगत्वावर मात करून यशस्वीपणे जीवन जगणारे सोमनाथ चौघुले हे अपंग उत्कर्ष सेवा संस्थेच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. एक महिन्यापूर्वी त्यांनी कार विकत घेतली आहे. कारची नोंदणी करण्यासाठी व वाहन चालविण्याचा परवाना मिळविण्यासाठी त्यांनी २५ जुलैला नवी मुंबई आरटीओ कार्यालयात गेले. परंतु तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांना योग्य वागणूक दिली नाही. अपंग नागरिकांना वाहन नोंदणी शुल्कातून सूट आहे. त्यामुळे विनाशुल्क नोंदणी करून मिळावी यासाठी त्यांनी अर्ज केला. परंतु आरटीओच्या नवीन प्रणालीमध्ये याविषयी तरतूदच नसल्याने त्यांना पूर्ण ४३६०२ रूपये भरण्यास भाग पाडले. २८ जुलैला त्यांनी पैसे भरल्यानंतर दोन दिवसात सर्व प्रक्रिया पूर्ण करून सर्व पैसे परत देण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले आहे. परंतु प्रत्यक्षात एक महिना पूर्ण झाल्यानंतरही अद्याप त्यांना परतावा दिलेला नाही. याविषयी वर्तमानपत्रांमध्ये बातमी आल्यानंतर प्रशासनाने त्यांच्या घरी जावून कागदपत्र संकलित केले व दोन दिवसात पैसे मिळतील असे सांगितले, परंतु प्रत्यक्षात काहीही झालेले नाही. अपंग उत्कर्ष सेवा संस्था यांनी याविषयी परिवहन मंत्री, आरटीओ आयुक्तांकडेही तक्रार केली आहे. चौघुले यांनीही परिवहन आयुक्तांसह सर्वांकडे तक्रार केली आहे. परंतु अद्याप त्याची दखल घेतलेली नाही. उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी त्यांना मेलवरून झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. परंतु चौघुले यांनी त्यांना पत्र देवून शासकीय अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांनी दिलगिरी व्यक्त करावी अशी आमची इच्छा नाही. वेळेत वाहनाची नोंदणी करून मिळावी. अधिकाऱ्यांनी सांगितले म्हणून पूर्ण शुल्क भरले आहे. परंतु एक महिन्यानंतरही शुल्क परत मिळत नाही. कोणतीही कपात न होता पैसे परत मिळावे एवढीच अपेक्षा आहे. अपंग नागरिकांच्या मानवी हक्कांचे उल्लंघन होवू नये, त्यांची अडवणूक होवू नये एवढीच अपेक्षा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)