शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
2
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
3
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
4
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
5
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
6
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
7
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
8
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
9
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
10
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
12
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
13
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
14
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
15
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
16
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
17
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
18
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
19
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळ्यापर्यंत नवीन नळजोडण्या नाहीत

By admin | Updated: January 16, 2016 00:35 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून पाणीकपात लागू केली आहे. उपलब्ध पाण्याचा साठा आगामी पावसाळ्यापर्यंत

नवी मुंबई : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांपासून पाणीकपात लागू केली आहे. उपलब्ध पाण्याचा साठा आगामी पावसाळ्यापर्यंत पुरावा यादृष्टीने सर्वंकष उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यापर्यंत नवीन नळ जोडण्या न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरणातून महापालिका नवी मुंबईकरांना २४ तास पाणीपुरवठा करते. त्यानुसार मोरबे धरणातून दिवसाला साधारण ४२८ एमएलडी पाणी घेतले जाते. असे असले तरी गेल्या वर्षी पावसाने दडी मारल्याने धरणाची पातळी खालावली. सध्या पुढील तीन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा धरणात शिल्लक राहिला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्याअंतर्गत १९ टक्के पाणीकपात करण्यात आली आहे. त्यामुळे दिवसाला आता ३00 एमएलडी इतका पाणीपुरवठा केला जात आहे. पूर्वीच्या पाणीपुरवठ्यात १२८ एमएलडी पाण्याची कपात करण्यात आली आहे. तसेच अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार आतापर्यंत तब्बल ४00 अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. पाण्याचा स्वैर वापर करणाऱ्या अनेक गृहनिर्माण सोसायट्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. हे करीत असताना पावसाळ्यापर्यंत नवीन नळजोडण्या न देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. (प्रतिनिधी)- नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात १ लाख २२ हजार अधिकृत नळजोडण्या आहेत. ९७२ किमी लांबीच्या जलवाहिन्यांद्वारे या नळजोडण्यांना पाणीपुरवठा केला जातो. परंतु सध्या १९ टक्के पाणीकपात केल्याने ग्राहकांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. याचा परिणाम म्हणून अनेक वसाहतींना पाणी मिळत नाही. त्यामुळे त्यांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. विशेषत: एमआयडीसी परिसरातील झोपडपट्टी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी समस्या भेडसावताना दिसत आहे.