शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे-बेलापूर रोडवर तुर्भेमधील उड्डाणपुलाचा प्रश्न मार्गी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2019 00:39 IST

पाठपुराव्याला यश; तीन महिन्यांत काम सुरू होणार

नवी मुंबई : ठाणे-बेलापूर रोडवर तुर्भे स्टेशनसमोर उड्डाणपूल बांधण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. हजारो नागरिक शुक्रवारी स्टेशनसमोर जमा झाले होते. रहिवाशांमधील असंतोषाची दखल घेऊन प्रशासनाने तत्काळ हा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.नवी मुंबईमधील सर्वाधिक वाहतूककोंडी तुर्भे स्टोअर्स परिसरामध्ये होत आहे. रेल्वे स्टेशनच्या समोर दिवसभर चक्का जामची स्थिती असते. या ठिकाणी वारंवार अपघात होत असून आतापर्यंत १५ पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वारंवार होणाऱ्या अपघातामुळे या ठिकाणी उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याची मागणी नगरसेवक सुरेश कुलकर्णी व इतर राजकीय पदाधिकाऱ्यांनीही केली होती. प्रशासनाकडून हा प्रश्न मार्गी लावला जात नसल्यामुळे नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये कुलकर्णी यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले होते. जमिनीवर बसून आंदोलन केले होते. यानंतर शुक्रवारी तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. सकाळी परिसरातील हजारो नागरिक स्टेशनसमोर एकत्र आले होते. नागरिकांमधील असंतोषाची दखल घेऊन महापालिका प्रशासनाने शहर गतिशील योजनेअंतर्गत या रोडवर उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याचे आश्वासन दिले आहे.प्रशासनाने दिलेले आश्वासनठाणे-बेलापूर रस्त्यावर तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर तुर्भे स्टोअर्स येथे होत असलेल्या वाहतूककोंडीमुळे नागरिकांचा खोळंबा होत आहे. तसेच वाहतूककोंडीमुळे स्थानिक नागरिकांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत २० नोव्हेंबरच्या सर्वसाधारण सभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता. त्या अनुषंगाने या रोडवर उड्डाणपूल बांधणे प्रस्तावित केले आहे. या कामाची फेरनिविदा करणेबाबत प्रस्ताव महासभेत सादर केला आहे. महासभेच्या मंजुरीनंतर पुढील तीन महिन्यांत प्रत्यक्ष काम सुरू करण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासनात म्हटले आहे.तुर्भे रेल्वे स्टेशनसमोर वारंवार अपघात होत आहेत. वाहतूककोंडीही होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी उड्डाणपुलाचे बांधकाम करण्याची मागणी आम्ही केली होती. शुक्रवारी रास्ता रोको करण्यात येणार होते. प्रशासनाने लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.- सुरेश कुलकर्णी, नगरसेवक