शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बॅनर फाडल्याने कर्जतमध्ये तणाव

By admin | Updated: January 25, 2016 01:25 IST

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कर्जत शहरात शिवसैनिक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फलक लावले होते.

कर्जत : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त कर्जत शहरात शिवसैनिक आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी फलक लावले होते. त्यापैकी काही जाहिरात फलक हे एका जाहिरात एजन्सीच्या बोर्डावर लावण्यात आले होते. ते कंपनीच्या कामगारांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या दिवशी काढून टाकले. जाहिरात फलक फाडून रस्त्यावर फेकल्याने कर्जत तालुक्यातील शिवसैनिक रस्त्यावर उतरले आणि काही काळ कर्जत शहरात तणाव निर्माण झाला.दरम्यान, या प्रचंड तणावाच्या वातावरणात जाहिरात एजन्सीचे तब्बल १० लोखंडी फलक जमीनदोस्त करण्याचे काम जेसीबी मशिन लावून करण्यात आले, त्याबद्दल कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल सर्वांच्या मनात आदराची भावना असताना आज त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांना अभिवादन करणारे फलक सर्वत्र झळकत आहेत. त्यातच शिवसेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी तसेच शिवसैनिक यांच्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असतो. त्यांच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी इतर ठिकाणांसह कर्जत शहरातही मोठ्या प्रमाणात फलक लावण्यात आले होते. कर्जत शहरातील काही मोक्याच्या ठिकाणी जाहिरात फलक लावण्यासाठी कर्जत नगरपालिकेने टेंडर ठाणे येथील श्रुती जाहिरात एजन्सीला दिले आहे. त्या फलकावर काही ठिकाणी शिवसेनेचे जाहिरात फलक लावले होते. लावलेले फलक श्रुती जाहिरात एजन्सीच्या कामगारांनी फाडून टाकले. ठाकरे यांचे बॅनर फाडून टाकल्याची बातमी पसरताच सुमारे ३०० शिवसैनिक कर्जत येथे जमले. बाळासाहेब ठाकरे याचे बॅनर फाडणारा कोण, अशी विचारणा होत शहरातील वातावरण बदलले आणि प्रचंड तणाव निर्माण झाला. शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख संतोष भोईर, तालुकाप्रमुख संभाजी जगताप, युवासेनेचे कर्जत तालुका अधिकारी मयूर जोशी, जिल्हा परिषदेचे बांधकाम समितीचे माजी सभापती उत्तम कोळंबे, माजी तालुकाप्रमुख बाळाजी विचारे, विरोधी पक्षनेते नितीन सावंत, संतोष पाटील आणि अन्य प्रमुख नेते शिवसैनिकांना शांत राहण्याचे आवाहन करीत होते. श्रुती जाहिरात एजन्सीच्या फलकावर बॅनर लावले होते, त्या एजन्सीकडे कर्जत नगर परिषदेने जाहिरात फलकाचे टेंडर तीन वर्षांसाठी दिले आहे. (वार्ताहर)