शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराष्ट्रीय विमानतळपूर्व विकासकामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण

By admin | Updated: March 9, 2017 02:48 IST

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात येणाऱ्या उलवा टेकडीची उंची कमी करण्याबरोबरच गाढी नदीचे पात्र बदलणे, जमिनीचे सपाटीकरण व उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या

नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गात येणाऱ्या उलवा टेकडीची उंची कमी करण्याबरोबरच गाढी नदीचे पात्र बदलणे, जमिनीचे सपाटीकरण व उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे या विमानतळपूर्व कामांसाठी सिडकोने निविदा काढल्या आहेत. सुमारे १७00 कोटी रुपये खर्चाच्या या कामांना लवकरच सुरुवात होण्याची शक्यता संबंधित विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मार्गातील बहुतांशी अडथळे दूर झाले आहेत. आर्थिक निविदा प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. त्यामुळे सिडकोने आता विमानतळपूर्व विकासकामांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे. पहिल्या टप्प्यात उलवा टेकडीची उंची कमी करणे, गाढी नदीचे पात्र बदलणे, जमीन सपाटीकरण व उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करणे आदी प्रमुख कामांचा यात समावेश आहे. प्रमुख अडथळा ठरणाऱ्या उलवे टेकडीची उंची ९२ मीटर इतकी असून विमानतळाच्या धावपट्टीच्या मार्गात या टेकडीचा अडथळा ठरत आहे. त्यामुळे या टेकडीची उंची आठ मीटरने कमी करावी लागणार आहे. या कामासाठी दीड ते दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, तसेच गाढी नदीचे पात्र बदलणे आवश्यक आहे. जमिनीचे सपाटीकरण करण्याची कार्यवाही यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे, तर उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्या भूमिगत करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. प्रस्तावित नवी मुंबई विमानतळावरून २0१९ मध्ये विमानाचे टेकआॅफ करण्याच्या दृष्टीने सिडकोने कंबर कसली आहे. त्या पार्श्वभूमीवर विमानतळपूर्व विकासकामांना पुढील काळात गती प्राप्त होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (प्रतिनिधी)