शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका घेणार तात्पुरते मनुष्यबळ

By admin | Updated: October 15, 2016 07:01 IST

पनवेल महानगरपालिकेत वसाहती वर्ग करण्यास सिडको इच्छुक आहे. तशी तयारीही सिडकोकडून सुरू आहे. मात्र हा डोलारा सांभाळण्याकरिता पनवेल महापालिकेकडे

अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलीपनवेल महानगरपालिकेत वसाहती वर्ग करण्यास सिडको इच्छुक आहे. तशी तयारीही सिडकोकडून सुरू आहे. मात्र हा डोलारा सांभाळण्याकरिता पनवेल महापालिकेकडे सध्या पुरेसे मनुष्यबळ नाही. त्यामुळे महापालिकेच्यावतीने प्रतिनियुक्तीवर अभियंते घेण्याबाबत सिडकोकडे प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्यास सकारात्मक प्रतिसादही देण्यात आला आहे.नवीन पनवेल आणि खांदा वसाहत हा परिसर आधी पनवेल नगरपालिका क्षेत्रात असला तरी नियोजन प्राधिकरण म्हणून सिडको काम करीत असल्याने पायाभूत सुविधाही सिडकोकडून पुरविण्यात येत होत्या. आता जवळपास सगळ्या विकसित वसाहती महापालिकेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सिडको वसाहतीमध्ये यापुढे बांधकाम करायचे असेल तर त्याकरिता लागणारी परवानगी सिडकोने देणे बंद केले आहे. आता पनवेल शहर महानगरपालिकेकडून परवानगी देण्यात येणार आहे. एकंदरीतच सिडको प्रशासनाने हे अधिकार महापालिकेला वर्ग केले आहेत. परंतु सध्या पनवेल महापालिकेकडे अभियंते आणि इतर मनुष्यबळाची कमतरता आहे. नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, कामोठे या सिडको वसाहतीत बांधकाम परवानग्या देण्याकरिता उपलब्ध मनुष्यबळ पुरेसे नाही. त्याकरिता महानगरपालिकेने नवीन भरती होईपर्यंत सिडकोकडून प्रतिनियुक्तीवर मनुष्यबळ मागितले आहे. तसा प्रस्तावही सिडको प्रशासनाला दिला आहे. यासंदर्भात बैठक सुध्दा झाली असल्याची माहिती समोर येत आहे. सिडकोकडून तात्पुरत्या स्वरूपात अभियंते आणि इतर मनुष्यबळ मिळाले तर प्रशासनाला काम करणे सोपे जाईल. त्याचबरोबर पाणीपुरवठा व घनकचरा व्यवस्थापन सुध्दा महापालिकेकडे वर्ग होणार आहे. ते सुध्दा तात्पुरत्या स्वरूपात सिडकोकडून घेण्याबाबत प्रशासन विचाराधीन आहे. महापालिकेच्या मागणीप्रमाणे आम्ही तात्पुरत्या स्वरूपात अधिकारी आणि कर्मचारी देण्याबाबत सकारात्मक असल्याचे सिडकोच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.