शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनो, एकत्र येऊन लढा

By admin | Updated: December 26, 2016 06:57 IST

गेल्या काही वर्षांत शिक्षकांचे प्रश्न, समस्या वाढल्या आहेत. मात्र, त्यासाठी केवळ मोर्चे, आंदोलने करून उपयोग नाही,

ठाणे : गेल्या काही वर्षांत शिक्षकांचे प्रश्न, समस्या वाढल्या आहेत. मात्र, त्यासाठी केवळ मोर्चे, आंदोलने करून उपयोग नाही, त्यापेक्षा सर्व शिक्षकांनी एकत्र या, परिस्थितीला सामोरे जा, लढा द्या. गरज पडली, तर मी तुम्हाला सहकार्य करीन, असा सल्ला मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख यांनी शिक्षकांना दिला. ठाणे आणि पालघर जिह्यातील ६४ शिक्षकांचा सांदिपनी पुरस्कार देऊन गौरव केला.कै. एन. एस. जे. शैक्षणिक व सामाजिक संस्थेतर्फे ‘शिक्षक सन्मान दिन’ सोहळा शुक्रवारी सायंकाळी घंटाळी मैदानाच्या पटांगणावर झाला. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. देशमुख होत्या. त्या म्हणाल्या की, ज्ञान-विज्ञानाबरोबरच प्रज्ञान व आत्मज्ञानही असते. शिक्षक मुलांना आत्मज्ञान शिकवतात. आजचा शिक्षक हा गुरुकुलापासून सायबरकुलाकडे चालला आहे. पूर्वी आपल्याला शिक्षण घेण्यासाठी गुरूच्या घरी गुरुकुलात जावे लागत असे. आताच्या युगात गुरूही कॉम्प्युटरच्या आधारे एका क्लिकवर कशी माहिती मिळवता येते, हे शिकवतात. शिक्षणपद्धती कोणतीही असो, प्रत्येक शिक्षक मुलांना घडवतात. शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत. त्यांना आंदोलन करावे लागते. पण अशी वेळ येऊ नये. शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी योग्य मार्गदर्शन करावयाला आपण सदैव सोबत असल्याची ग्वाही त्यांनी दिली.आज वकील, डॉक्टर, अभियंते, सीए, शिक्षक इत्यादींच्या मुलांना भविष्यात कोण होणार असे विचारले तर कोणीही शिक्षक होणार अशी इच्छा व्यक्त करत नाहीत. ही चूक शिक्षक वा विद्यार्थ्यांची नाही. याचे खरे कारण म्हणजे शिक्षकी पेशाचा हरवलेला सन्मान असे मत शिक्षकमित्र अ‍ॅड. केदार जोशी यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)