शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकाकडून विद्यार्थ्याला काठीने मारहाण

By admin | Updated: March 20, 2016 01:07 IST

वर्ग सुरू असताना मस्ती केल्यामुळे शिक्षकाने आठवीच्या विद्यार्थ्याला काठीने मारहाण केल्याची घटना शिरवणे येथील पालिका शाळेत घडली आहे. शनिवारी मुलाने शाळेत जायला

नवी मुंबई : वर्ग सुरू असताना मस्ती केल्यामुळे शिक्षकाने आठवीच्या विद्यार्थ्याला काठीने मारहाण केल्याची घटना शिरवणे येथील पालिका शाळेत घडली आहे. शनिवारी मुलाने शाळेत जायला नकार दिल्याने हा प्रकार उघड झाला. याप्रकरणी शिक्षकाविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.शिरवणे येथील महापालिका शाळा क्रमांक १४ मध्ये शुक्रवारी हा प्रकार घडला आहे. सदर शाळेत आठवीमध्ये शिकणाऱ्या एका मुलाला शाळेचे शिक्षक रवींद्र फाफळे यांनी अंगावर जखमा होईपर्यंत मारहाण केली. वर्ग सुरू असताना मस्ती केल्याचा राग आल्याने शिक्षकाने आपल्याला काठीने मारहाण केल्याचे त्या विद्यार्थ्याचे म्हणणे आहे. या प्रकारात त्याच्या हातावर व शरीरावर गंभीर जखमा देखील झाल्या आहेत. परंतु मस्ती करणाऱ्या दुसऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षा न करता केवळ आपल्यालाच सूडवृत्तीने मारहाण झाल्याचेही विद्यार्थ्याचे म्हणणे आहे. शुक्रवारी शाळेत झालेल्या या प्रकारामुळे भयभीत झालेल्या या विद्यार्थ्याने शनिवारी शाळेत जायला नकार दिला. यावेळी घरच्यांना त्याला झालेल्या मारहाणीची माहिती मिळाली. नेरूळ पोलीस ठाण्यात सदर शिक्षकाविरोधात तक्रार करण्यात आली आहे. तसेच शिक्षण मंडळाने संपूर्ण प्रकाराची चौकशी करून शिक्षकावर कारवाईची मागणी विवेक सुतार यांनी केली आहे. (प्रतिनिधी)सूडवृत्तीने मारहाण या प्रकाराबाबत संताप व्यक्त करीत स्थानिक सामाजिक कार्यकर्ते विवेक सुतार यांनी विद्यार्थ्याच्या पालकांसह शिक्षकाची भेट घेऊन जाब विचारला. यावेळी समाधानकारक उत्तर न मिळाल्याने जाणीवपूर्वक विद्यार्थ्याला मारहाण झाल्याची शंका त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकारामुळे पालकवर्गातूनही संतापाचे वातावरण आहे.